Nanded News 
नांदेड

नांदेड : शासनाने काढलेल्या ड्रेसकोड आदेशाचे स्वागत - दत्तू डहाळे 

प्रमोद चौधरी

नांदेड : सद्यस्थितीत पाश्चात्य संस्कृती समाजामध्ये रुजल्याने त्याचा भारतीय संस्कृतीवर परिणाम होताना दिसत आहे. चित्रविचित्र कपडे घालण्याची प्रथा विशेषतः तरुणाईंमध्ये रुढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात ‘ड्रेसकोड’चा काढलेला आदेश स्वागतार्ह आहे’, असे मत पाचलेगावकर महाराज आश्रमातील दत्तु डहाळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. 

त्यांनी सांगितले की, सध्या चित्रपट तसेच वाहिन्यांवरील मालिका, जाहिरातींमध्ये दाखविण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह दृश्यांचा परिणाम भावी पिढीवर होत आहे. परिणामी भारतीय संस्कृतीला ही पाश्चात्य संस्कृती घातक ठरत आहे. चित्रपट, मालिका तसेच जाहिरातींतून नागरिकांनी काय घ्यावे? हा मोठा गहन प्रश्न आज निर्माण झाला आहे. मुलाने किंवा मुलीनी चित्रविचित्र कपडे घातले की, पालकही त्यांच्याकडे कौतुकाने बघतो. हे बरोबर नसल्याची खंतही श्री. डहाळे यांनी व्यक्त केली आहे. 

आज फॅशनच्या नावाखाली तरुणाही काहीही करत आहेत. हजारो रुपयांचा ड्रेस फाडून ते घालणे, केस वाढवणे, कानात बाळ्या घालणे आदी प्रकार सर्रासपणे होत असल्याने आपण कुठे चाललो? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. केवळ पाश्चात्य संस्कृतीला जवळ केल्यामुळे हा सामाजिक परिणाम दिसून येतो आहे. आपली संस्कृती कुठे गेली? आपण काय करतो? काय पाहतो? याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. रात्री जागरण करून सकाळी उशीरा उठणे ही एक फॅशन तरुणाईंमध्ये रुजल्यामुळे असंख्य शारीरिक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही श्री. डहाळे यांनी सांगितले. 

मुलीही शॉर्ट कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे फिरत आहे. परिणामी अत्याचाराच्या, छेडछाडीच्याही घटना दिवसेंदिवस वाढत असून, याचा प्रत्यय मला विसावा उद्यानात आल्याचेही श्री. डहाळे यांनी सांगितले. त्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार देवून, पोलिसांनीही प्रामाणिक कर्तव्य पार पाडावी. जेणे करून अत्याचाराच्या घटनांना काहीअंशी प्रमाणात आळा बसेल, अशी सूचनाही श्री. डहाळे यांनी केली आहे. 

पाश्चात्य संस्कृतीला आळा घालावा
पूर्वी स्त्रियांना मर्यादा होती. स्त्रियांनी कसे वागावे याचे प्रबोधन व्हायचे. अलिकडे मात्र स्त्रियांना समान अधिकार मिळाल्याचे दुष्परिणाम बघायला मिळत आहे. आज डोक्यावर पदर असणाऱ्या स्त्रिया क्वचित दिसतात. त्यामुळे केवळ शासकीय कार्यालयांमतच ड्रेसकोडची सक्ती न करताना पाश्चात्य संस्कृतीलाही आळा घालण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. 
- दत्तु डहाळे, पाचलेगावकर महाराज आश्रम नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT