फोटो 
नांदेड

उच्च न्यायालयाच्या ‘काय’ आहेत गाईडलाईन...? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या उद्भवलेल्या कोविड- 19 या साथीच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. चार) मे रोजी परिपत्रकान्वये विविध मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकील, न्यायाधीश यांनी नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करुन सहकार्य करावे, असे प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी आवाहन केले आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी नांदेड जिल्हा न्यायीक विभागातील सर्व आस्थापना प्रमुख, न्यायीक अधिकारी यांना कळविले आहे की, त्यांनी आपआपल्या न्यायालयात उच्च न्यायालयाच्या नमूद मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन तात्काळ प्रभावाने होण्याच्यादृष्टीने उचित कार्यवाही लगेच करावी. पुढील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले आहे.

मास्क किंवा रुमाल बांधलेला असेल तरच न्यायालयात प्रवेश 

न्यायालयात प्रवेश करणाऱ्या सर्व विधीज्ञ, पक्षकार व कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये आरोग्य सेतू ॲप स्थापीत करण्याच्या सुचना द्याव्यात. न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ न्यायालयात प्रवेश करणाऱ्या विधिज्ञ, पक्षकारांचे ओळखपत्र तपासून त्या सर्वांची एका स्वतंत्र नोंदवहीत नोंद केली जाण्याची व्यवस्था करावी. चेहरा व्यवस्थीतरित्या झाकला जाईल, अशा प्रकारे मास्क अथवा रुमालाने बांधलेला असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस प्रवेश दिला जाऊ नये. 

अत्यंत तातडीची व रिमांडची प्रकरणे दुपारी १२ ते दोन या कालावधीत 

न्यायदालनामध्ये शिरण्यापूर्वी हात पाण्याने व सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावे. प्रस्तुत परिपत्रक आपल्या मुख्यालयी असलेल्या स्थानिक अधिवक्ता संघाच्या निदर्शनास आणून दयावे. तसेच शनिवार (ता. १६) मेपर्यंत फक्त अत्यंत तातडीची व रिमांडची प्रकरणे दुपारी १२ ते दोन या कालावधीत घेतली जातील. न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकील आणि न्यायाधीश यांनी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT