खासदार प्रताप पाटील चिखलीकर 
नांदेड

शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत खासदार चिखलीकर काय म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे साठ टक्क्यांहून अधिक कापूस घरात पडून असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे येत्या ता. दहा जूनपर्यंत शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करा त्यासाठी जिल्हाभरात कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुरुवारी (ता. २१) जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांची भेट घेऊन केली आहे.

शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आणि जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर ही संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल? असा गंभीर इशाराही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिला.

साठ टक्क्यांहून अधिक कापूस घरात पडून
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत राहिलेला आहे. दुष्काळाच्या छायेखाली राहणाऱ्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण आहे. नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडे अद्यापही साठ टक्क्यांहून अधिक कापूस घरात पडून असल्याने शेतकऱ्यांसमोर येत्या खरीप हंगामात पेरणी कशी करावी हा प्रश्न पडला आहे. 

आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार!
शेतकऱ्यांचा कापूस संपूर्णपणे खरेदी केला गेला नाही तर शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आर्थिक संकटाला घाबरुन आत्महत्या कराव्या लागतील आणि या आत्महत्यांना राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा देतानाच त्यामुळे नांदेड जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. येत्या ता. दहा जूनपर्यंत संपूर्ण कापसाची खरेदी करावी. शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळामध्ये काही दुकाने सुरू करण्यासाठी सूट मिळाल्यानंतर नांदेड शहरत काही दुकान सुरू करण्यात आली. यातही जिल्हाधिकारी कोणाच्यातरी दबावाखाली येऊन तफावत करत असल्याचा आरोपही यावेळी खासदार चिखलीकर यांनी केला. नांदेड शहर आणि जिल्ह्यात दारू विक्रीला परवानगी देण्यात आली, मात्र ज्या व्यापाऱ्यांनी कर्ज काढून कापड दुकाने उभारली ती कापड दुकान अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत. एकीकडे दारू विक्रीला परवानगी दिली जाते तर दुसरीकडे कापड विक्रीला मात्र जाणीवपूर्वक बंदी घातली जाते. याचा अर्थ जिल्हाधिकारी यांच्यावर कोणाचातरी दबाव आहे आणि तो दबाव का? आणि कशासाठी? असा सवालही खासदार चिखलीकर यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरित निर्णय घ्यावेत नांदेड शहर आणि जिल्ह्यातील कापड दुकान त्वरित सुरू करावीत, व्यापाऱ्यांची आर्थिक कोंडी होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही खासदार चिखलीकर यांनी यावेळी दिल्या. यावेळी भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, मिलिंद देशमुख आदींची उपस्थिती होती.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT