लाचेच्या जाळ्यात कंधार पोलिस  
नांदेड

काय झाले नांदेड पोलिसांना : कंधार पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार चोपडे एसीबीच्या जाळ्यात

कंधार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तक्रारदाराने आपल्या विरोधात आलेल्या तक्रार अर्जाची माहिती घेण्यासाठी दुरक्षेत्र पोलिस चौकी कुरुळा येथे गेला.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कंधार ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कारवाई न करण्यसाठी दहा हजाराची लाच मागून पाच हजार स्विकारल्याप्रकरणी कंधार ठाण्यांततर्गत असलेल्या कुरुळा दूरक्षेत्र पोलसि चौकीचा लाचखोर सहाय्यक फौजदार सुभाष चोपडे याच्यासह एका खासगीव्यक्ती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाल्यात बुधवारी (ता. नऊ) सायंकाळी अडकला. या दोघांविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कंधार पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तक्रारदाराने आपल्या विरोधात आलेल्या तक्रार अर्जाची माहिती घेण्यासाठी दुरक्षेत्र पोलिस चौकी कुरुळा येथे गेला. तेथील चौकीचे प्रमुख सुभाष म्हैसाजी चोपडे (वय ५६) रा. सिडको, नांदेड याने कारवाई न करण्यासाठी दहा हजाराची लाच माहितीली. तडजोअंती पाच हजार रुपये लाच देण्याचे ठरले. परंतु लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने ता. तीन जून रोजी नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिली.

हेही वाचा - न्यायपीठाने भेदक प्रश्‍न विचारावेत, चौकशा कराव्यात; पण आपले विश्‍लेषण निर्णयातून अभिव्यक्त करावे, ही रुजलेली पद्धत आहे. शेरेबाजी करण्याचे प्रकार मात्र न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत

या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नऊ जून रोजी कुरुळा दुरक्षेत्र चौकी परिसरात सापळा लावला. यावेळी सरकारी पंचासमक्ष श्री. चोपडे याचा खासगी व्यक्ती शेख फारुख शेक युसुयप रा. कुरुळा, ता. कंधार याच्यामार्फत पाच हजार रुपये घेताना रंगेहात लाचेच्या जाळ्यात अडकले. सुभाष चोपडे व शेख फारुख यांच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात लाचप्रकरणी गुन्हा दाकल करण्यात आला. दोन दिवसापूर्वीच इस्लापूरचा पोलिसावर गुन्हा दाखल झाला होता. दोन दिवसाता दोन पोलिस लाचेच्या जाळ्यात अडकतात म्हणजे नांदेड पोलिसांना झाल तरी काय? असा प्रश्न उपस्तित होत आहे.

या सापळा कारवाईत पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद हिंगोले, हवालदार किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, दशरथ जाधव, नरेंद्र बोडके, श्री. अनंतवार यांनी पार पाडली.

येथे क्लिक करा - देशातील विविध भागांतील नेते दिल्लीच्या जोडगोळीला घाबरत आहेत. पण या जोडगोळीला पुरून उरणारा सगळ्या देशात एकच नेता आहे आणि ते म्हणजे मा. शरद पवार साहेब.

सर्व नागरिकांना आवाहन

शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर टोल फ्री क्रमांक 10 64 व एसीबी कार्यालयाचा फोन क्रमांक झिरो ०२४६२- २५३५१२ किंवा पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांचा मोबाईल क्रमांक ८९७५७६९९१८ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT