file photo 
नांदेड

गुन्हेगारी जगतात काय घडले दिवसभरात नांदेड जिल्ह्यात? वाचा एका क्लिकवर

प्रमोद चौधरी

नांदेड ः दिलीपसिंघ काॅलनीमध्ये आरोपींनी संगनमत करून लक्ष्मी शंकर वंगला यांना खंजरचा धाक दाखवून सॅमसंग कंपनीचा सहा हजार रुपयांचा मोबाईल तसेच रोख ५०० असा सहा हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. सात मार्च रोजी ही घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मी वंगला यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

मुखेडला चार लाखाची घरफोडी
नांदेड ः सखाराम यशवंतराव गोरे यांचे मनोहर टाॅकीजच्या बाजूला मुखेड येथे घर आहे. चोरट्यांनी सात ते आठ मार्चच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील लाकडी कपाटाचे लाॅक तोडून १५ तोळ्याचे चार लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरट्यांनी चोरून नेले. सखाराम गोरे यांच्या फिर्यादिवरून मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गॅरेजमध्ये २२ हजार रुपयांची चोरी
नांदेड ः बारड येथे एसार पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ऋतुजा टायर वर्कमधून चोरट्यांनी २२ हजार ३०० रुपयांचा माल चोरून नेला. शिवानंद हानमंत गुंडे यांनी फिर्यादीत म्हटले की, नेहमीप्रमाणे मी सात मार्च रोजी गॅरेज बंद करून घरी गेलो. यादरम्यान चोरट्यांनी गॅरेजमधील एअर काॅम्प्रेसर मोटार, एअर जॅक, दोन राॅड, एक कारचे टायर असा एकूण २२ हजार ३०० रुपयाचा माल चोरून नेला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बारड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ
नांदेड ः तु चांगली नाहीस, तु सायको आहेस, असे म्हणून घर खर्चासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेवून ये असे म्हणत २५ वर्षिय महिलेचा सासरी (मुंबई) छळ केला जात होता. शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याने सदर विवाहितेने भाग्यनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार सासरकडील मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ज्येष्ठ नागरिकाची गळफास घेऊन आत्महत्या
नांदेड ः धनाजी विठोबा तेलंग (वय ६५) यांची नावंद्याची वाडी (ता.कंधार) येथे शेती आहे. नेहमीप्रमाणे ते शेतात गेले असता कोणत्यातरी कारणावरून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नरहरी भुजंगा कानगुले यांच्या तक्रारीवरून कंधार पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड ः सततच्या नापिकीला तसेच बॅंकेचे, सहकारी सोसायटीचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या तणावातून एका शेतकऱ्याने घरीच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सात मार्च रोजी उघडकीस आली.
मंगलसांगवी (ता.कंधार) येथे गोविंद व्यंकटराव कदम (वय ४८) यांची वडिलोपार्जित शेती आहे. अतिवृष्टीमुळे झालेली नापीकी व शेतीवर बॅंकेचे कर्ज, सहकारी सोसायटीचे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या तणावात ते होते. त्यांचा पीक विमाही नामंजूर झाल्याने ते अधिकच चिंतेत होते. शिवाय मुलीच्या लग्नासाठी घेतलेले खासगी कर्ज कसे फेडावे, अशा असंख्य चिंतेतून गोविंद कदम यांनी घरीच गळफास घेवून आत्महत्या केली आहे. त्यांना उपचारासाठी उस्माननगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्र्यंबक व्यंकटराव कदम यांच्या माहितीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यामध्ये आक्समिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री. केंद्रे तपास करत आहेत.

जिल्ह्यात दोन दुचाकीची चोरी
नांदेड ः संग्राम भगवानराव जाधव यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस कंपनीची दुचाकी (क्. एमएच-२६,५९६२) जीवन मेडीकल कंधार येथून चोरीला गेली आहे. त्यांच्या तक्रारीवरून कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच संजय सुर्यकांत सुर्यवाड (रा. विकासनगर कौठा) यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी (एमएच-२६, बीक-९२४३) चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली आहे. संजय सुर्यवाड यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

SCROLL FOR NEXT