lockdown  
नांदेड

नांदेड जिल्ह्यात ताळेबंदी कालावधीत काय बंद? काय सुरु राहणार? वाचा सविस्तर

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या अधिकारामधील अटी व शर्तीसह पुढील आणखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यात ता. एक जूनचे सकाळी सातपर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविला आहे.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविड विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव (Covid virus) झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून ता. १५ मेपर्यंत अत्यावश्यक सेवेच्या दुकानांबाबत (imergency shop open) सकाळी सात ते ११ पर्यंतची वेळ निश्चित केली होती. १५ मेनंतर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नव्याने आदेश काढणे आवश्यक होते. राज्य शासनाच्या ता. १२ मेच्या आदेशानुसार राज्‍यात ब्रेक दि चेन अंतर्गत ताळेबंदीचा कालावधी ता. एक जूनपर्यंत वाढवून यापुर्वीच्‍या आदेशान्‍वये दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनासह (guidline lockdown) पुढील आ‍णखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू राहतील असे निर्देशीत केले आहे. (What is closed during the balance sheet period in Nanded district? What will continue? Read detailed)

त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांच्या अधिकारामधील अटी व शर्तीसह पुढील आणखी काही अतिरिक्‍त निर्बंध लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्‍ह्यात ता. एक जूनचे सकाळी सातपर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविला आहे.

या आदेशात कोणत्याही वाहनाने महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींनी निगेटिव्ह (नकारात्मक) आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. हा अहवाल राज्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा.

हेही वाचा - महात्मा बसवेश्वर शांत, चिंतनशील, विवेकनिष्ठ व चिकित्सक वृत्तीचे असल्याने त्यांचा बालपणापासूनच समाजातील अंधश्रद्धा, वाईट चालीरीती, पशुहत्या, जातीभेद या गोष्टींना विरोध होता.

संवेदनशील ठिकाणाहुन येणाऱ्या व्यक्ती मग त्या देशातील कोणत्याही प्रदेशातील असो त्यांना यापूर्वीचे आदेश ता. १८ एप्रिल व एक मे मधील सर्व प्रतिबंध लागु राहतील.

कार्गो वाहतूकीमध्ये एक चालक व सफाईगार अशा दोनच व्यक्तीनाच परवानगी असेल. जर कार्गो वाहतूक ही राज्याबाहेरील असेल तर त्या वाहनातील कर्मचारी यांनी निगेटिव्ह (नकारात्मक) आरटीपीसीआर चाचणी अहवाल बाळगणे आवश्यक आहे. सदर अहवाल राज्यातील प्रवेशाच्या ४८ तासांपूर्वीचा असावा व तो सात दिवसांकरिता वैध राहिल.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ग्रामीण बाजार व कृषीउत्पन्न बाजार समित्यांवर कोविड संसर्गाचे अनुषंगाने विशेष निगराणी ठेवावी. आणि जर अशा ठिकाणी कोविडचा संसर्ग रोखण्याचे दृष्टीने अडथळा येत असेल असे निदर्शनास आल्यास सदर ठिकाणे बंद करणे बाबत किंवा बंधने कडक करणे बाबत निर्णय घ्यावा.

दूध संकलन, वाहतूक, प्रक्रिया निर्बंधाशिवाय चालू राहतील. परंतु अत्यावश्यक वस्तूंचे व्यवहार किंवा होम डिलिव्हरीवर जी बंधने लागु असतील त्या बंधनासह किरकोळ विक्रीस परवानगी दिली जावी.

विमानतळ आणि बंदर सेवांमध्ये व्यस्त असलेले आणि कोविड व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या औषधाशी संबंधित वस्तू किंवा उपकरणे यांचे वाहतूकीशी संबंधित व आवश्यक असणा-या कर्मचा-यांना स्थानिक, मोनो, मेट्रो सेवांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.

आवश्यक असल्यास विशिष्ट भागांकरिता इतर काही निर्बंध स्थानिक आपत्ती प्राधिकरण लावु शकेल पण त्यापूर्वी उपविभागीय प्राधिकरणास अशा प्रकारचे निर्बंध लावीत असलेबाबत ४८ तासांपुर्वी पूर्वसूचना देण्यात याव्यात.

येथे क्लिक करा - हिंगोली : अर्बन परिवाराकडून कोरोना रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा

या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, आयुक्‍त नांदेड वाघाळा महानगरपालीका, मुख्‍याधिकारी, सर्व नगरपरीषद / नगर पंचायत यांचेवर राहील.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था अथवा समुह, भारतीय दंड संहिता १८६०, साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ व आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम २००५, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्‍या कृत्‍यासाठी कोणत्‍याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्‍द कार्यवाही केली जाणार नाही, असे नमूद केले आहे. हे आदेशता. १३ मे रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT