file photo 
नांदेड

माहूरमध्ये कापूस व्यापाऱ्याने का केली आत्महत्या...? वाचा... 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पैशाच्या व्यवहारातून एका कापूस व्यापाऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना ता. सहा मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पाचुंदा (ता. माहूर) शिवारात घडली. या प्रकरणी माहूर पोलिस ठाण्यात आत्महत्येस परावृत्त करणाऱ्यांविरुद्ध रविवारी (ता. १०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन वानोळी (ता. माहूर ) येथील उत्तम रुपसिंग पवार (वय ५२) हे कापसाचे व्यापारी होते. त्यांनी राजू केंद्रे (वय ४०) रा. पवनाळा (वरचा) ता. माहूर यांचा कापूस खरेदी केला होता. या कापसाच्या पैसे देण्या- घेण्याच्या कारणावरून उत्तम पवार व राजू केंद्रे यांच्यात वाद झाला होता. उत्तम पवार यांना केंद्रे हे राहिलेले पैसे मागत होता. एवढेच नाही तर पैसे नाही दिले तर फौजदारी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होता. 

विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

या सततच्या धमकीला कंटाळून उत्तम पवार याने ता. सहा मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्याने पांचूदा शिवारातील दत्ता बाबु जाधव यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना समजताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर माहुर पोलिसांनाही कळविण्यात आले. माहूर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन उत्तम पवार याचा मृत्तदेह विहिरीबाहेर काढून पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह माहुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला. बुधवारी (ता. सहा) रात्री उशिरा त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. 

चारही आरोपी पसार

अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिन दिवसांनी रविवारी (ता.१०) त्याचा मुलगा रविंद्र उत्तम पवार याने माहूर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरुन माहुर पोलिसांनी राजू केंद्रे (वय ४०) याच्यासह चार जणांवर आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव, पोलिस निरीक्षक श्री. राख यांनी भेट दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार करत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सध्या एकही आरोपी अटक केलेला नसुन लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT