नांदेड : आमच्या विरोधात महापालिकेत तक्रार अर्ज का दिला यावरून संगनमत करून एकावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी चाकुने, तलवारीने पोटात मारून गंभीर दुखापत केली. ही घटना शहराच्या गाडीपूरा भागात बुधवारी (ता. २४) रात्री दहा वाजता घडली. शुक्रवारी (ता. २६) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
गाडीपूरा परिसरातील बडी दर्गाजवळ छोटा दरवाजा येथे राहणारा मोहमद अतीक मोहमद अब्दुल माजीद (वय २४) हा दिवसभर आपला आॅटो चालवून रात्री दहाच्या सुमारास घरी गेला. घरोसमोर आपला ॲटो लावत असतांना त्याला अद्दल घडविण्यासाठी व जुन्या वादातून संगनमत करून हल्लेखोर तबा धरुन बसले होते. अंधाराचा फायदा घेऊन शेख सोयल शेख रईस यांनी आपल्या काही साथिदारांना सोबत घेऊन मोहमद अतीक याला थांबविले. तु आमच्या विरोधात महापालिकेत अर्ज का दिला असे म्हणून त्याच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर त्याला तलवारीने व चाकुने जबर पोटात मारून जखमी केले. यात मोहमद अतिक खाली पडला. यावेळी हल्लेखोर पसार झाले. मोहमद अतीक याचे नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून लगेच जखमी अतिकला शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शुध्दीवर आल्यानंतर अतीक याने इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात शेख सोयल शेख रईस, शेख शादाब शेख रईस, शेख जफर शेख, शेख मुबाशीर शेख रईस, शेख अतीक शेख नजीर आणि शेख रईस शेख शफीयोद्दीन सर्व राहणार गाडीपूरा बडीदर्गा यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगीलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी भेट दिली. हा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री पठाण करत आहेत.
जिल्ह्यात सामाजिक न्याय दिन साजरा
नांदेड : सामाजिक न्यायासाठी कृतिशील आग्रह धरत आपल्या जीवनकार्यातून संदेश देणारे थोर कल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस आज “सामाजिक न्याय दिन” म्हणून जिल्हाभर साजरा करण्यात आला.
नांदेड शहरातील कृषी महाविद्यालयाजवळ असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळयास नागरिकांनी भेट देवून पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. जिल्ह्यात विविध कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले. यावेळी सामाजिक अंतर राखून सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.