vaccine sakal
नांदेड

लस न घेणाऱ्यास गावात प्रवेशबंदी

गावकऱ्यांचा निर्णय; नांदेड जिल्ह्यातील या गावाची होतेय चर्चा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला हिमायतनगर तालुक्यातील टेभूर्णीकरांनी प्रतिसाद देत गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले. याशिवाय लस न घेता गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना व बाहेरुन येणाऱ्या नातेवाईकांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण भागात लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरपंच यशोदाबाई पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील व उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, ग्रामसेवक अनिल कदम, लहाने, बांगर, आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी ही माहिती दिली. सरपंच पाटील यांनी या कामात जातीने लक्ष घालून गावातील नागरिकांशी चर्चा सुरू केली. सोबत ग्रामसेवक अनिल कदम, मुख्याध्यापक लहाने, बांगर, पोलिस पाटील किसनराव जाधव, शिवाजी जाधव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापूराव पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव पाटील या सर्वांच्या मदतीने घरोघरी जाऊन १८ वर्षांवरील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला, स्थलांतरित, कामासाठी बाहेर गेलेले ही सर्व माहिती उपलब्ध करून घेतली आणि गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगितले.

आत्तापर्यंत गावात शंभर टक्के पहिला डोस अणि ७५ टक्के दुसरा डोस असे लसीकरण झाले. गावांत येणारे फेरीवाले, भाजीपाला विकणारे, नातेवाईक यांना केंद्रात लस देऊन प्रवेश दिला जातो.

लसीकरणासाठी अनेकांचे सहकार्य

लस न घेणाऱ्यांना टेंभूर्णी गावात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच या संदर्भातला सर्व आढावा घेऊन गावातील नागरिकांना नवीन व्हेरिएंट ओमीक्रॉनबद्दल माहितीही देण्यात आली. आपला गाव परत तिसऱ्या लाटेकडे जाऊ नये, यासाठी लस घेणे आवश्यक आहे असे समजावले . लसीकरणासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. भालेराव, तुकाराम पौरे, काळे, ग्रामसेवक आनंद कदम, बापूराव माने, प्रभाकर माने, सुरेश देवसरकर, सुरेश पाटील, लक्ष्मीबाई जाधव, शिवाजी जाधव, किशनराव जाधव, विनायक माने, बाबुराव माने, विकास देवसरकर, किशोर कांबळे आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT