डाॅ. विद्याधर अटकोरे, नांदेड 
नांदेड

जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरण संशोधनात नांदेडचा अटकेपार झेंडा

मुंबई येथे त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून एक वर्ष काम केले. बेंगलोर येथे पीएचडी करताना त्यांनी कर्नाटक आणि गोवा येथील नद्यांच्या जलचरांच्या विविधतेवर अभ्यास केला.

प्रमोद चौधरी

नांदेड ः भारत सरकारच्या कोईम्बतूर येथील सलिम अली सेंटर फॉर आर्मी तानाजी अँड नॅचरल हिस्ट्री येथे नांदेडचे भूमीपुत्र डॉ. विद्याधर अटकोरे यांची वैज्ञानिक म्हणून नियुक्ती झाली आहे. या सेंटरमध्ये वाइल्डलाइफ तसेच पक्षी शास्त्र या विषयांमध्ये एमएससी आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. विद्याधर मार्गदर्शन करतील.

डॉ. विद्याधर अटकोरे हे नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार माधवराव अटकोरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहे. डॉ. विद्याधर यांनी नांदेड येथील नागसेन हायस्कूल मधून १९९६ मध्ये दहावीची तर सायन्स कॉलेजमधून १९९८ मध्ये बारावीची उत्तीर्ण केली आहे. पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांना भारतीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने फेलोशिप २००३- २००५ मध्ये प्रदान केली होती.

हेही वाचा - यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ३४७ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक शिवकालीन 'सुवर्ण होनाने' होणार: संभाजीराजे

त्यानंतर मुंबई येथे त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून एक वर्ष काम केले. बेंगलोर येथे पीएचडी करताना त्यांनी कर्नाटक आणि गोवा येथील नद्यांच्या जलचरांच्या विविधतेवर अभ्यास केला. त्यांच्या पीएचडीचा प्रबंध त्यांनी मणिपाल युनिव्हर्सिटी, कर्नाटक मध्ये दाखल केला. २०१७ मध्ये पीएचडी पदवी मिळवून त्यांनी लगेचच पोस्ट डॉक्टरल रिसर्च करण्यासाठी अरुणाचल प्रदेश मधील रंगा नदीवर आपले संशोधन सुरू केले.

डॉ. विद्याधर यांनी विविध देशांना भेटी देऊन आपले संशोधन प्रकल्प प्रस्थापित केले. यामध्ये प्रामुख्याने चीन, दक्षिण कोरिया, नॉर्वे, इंग्लंड, आणि अमेरिका येथे होणाऱ्या विविध परिषदांमध्ये सहभाग घेवून त्यांनी आपले संशोधन सादर केले. कॉलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातील नद्यांमधील संकटग्रस्त जलचर या विषयावर मार्गदर्शन केले. २०१६ मध्ये, वर्ल्ड फिशरीज काँग्रेस परिषदेमध्ये त्यांना संशोधन मांडण्यासाठी दक्षिण कोरियामध्ये बोलावण्यात आले होते. या परिषदेमध्ये जगातून सुमारे ५०० संशोधक आले होते. डॉ. विद्याधर यांनी सह्याद्री घाटांमधील विविध नद्यांमधील असलेल्या माशांच्या विविधतेवर मानवी हस्तक्षेपामुळे कसा ऱ्हास होतो आणि त्यावर काय उपाय करता येतील याबद्दल आपले संशोधन मांडले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT