फोटो 
नांदेड

नांदेडमध्ये ‘या’ ठिकाणी वर्षावासानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : महाविहार बावरीनगर दाभड- नांदेड येथे येत्या आषाढी पौर्णिमा (ता. पाच) जूलै ते आश्विन पौर्णिमा (ता. एक) ऑक्टोबर दरम्यान वर्षावासानिमित्त श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या श्रामणेर शिबिरात उपासक- उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविहार बावरीनगरचे मुख्य प्रवर्तक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे. तसेच शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उपासकांची covid-19 कोरोना तपासणी करूनच त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी माहिती शिबिराच्या संयोजकांकडून देण्यात आलेली आहे.

बौद्ध धम्मामध्ये आषाढी पौर्णिमेस खुप महत्वाचे स्थान आहे. याच पौर्णिमेस पाच महत्वाच्या घटना घडल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो. त्या म्हणजे महामाया महामातेस पडलेले स्वप्न अर्थात गर्भधारणा, सिद्धार्थ गौतमाने केलेला गृहत्याग, पाच परिव्राजकांना धम्माचा प्रथम उपदेश, भिक्खु दिक्षा आणि श्रद्धेय भिक्खुंचा वर्षावास प्रारंभ होय. असे तीर्थक्षेत्र महाविहर बावरीनगर दाभडच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आषाढ पौर्णिमा ते आश्विन 

पौर्णिमा या वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना धम्माचा प्रचार- प्रसार करताना पावसाचा तथा तत्सम अडचणींचा त्रास होऊ नये म्हणून तथागत भगवान बुद्धांनी या कालावधीत वर्षावासासंबंधीचे विनय भिक्खुंना सांगितले. त्यानुसार, भिक्खूंनी वर्षा ऋतुमध्ये एकाच ठिकाणी (विहारात) निवास करावा, असा नियम सांगितला. या काळात उपासक- उपासिका बुद्ध विहारात जाऊन धम्म ग्रहण करीत असतात. 

बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण

याच हेतुने सदर तीन महिन्याच्या कालावधीत महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कालावधीत बौद्ध धम्म संबंधी (संस्कार, संस्कृती) सखोल व गांभिर्यपूर्वक ज्ञान मिळवण्याची संधी उपासक उपासिकांना लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भिक्खू धम्मसेवक महाथेरो, भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खु पत्र्त्रारत्न थेरो, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न व श्रद्धेय भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.

येथे क्लिक करा - Video - भाजपने केला कपटी चिनी ड्रॅगनचा निषेध
यांच्याशी साधा संपर्क 


वय वर्षे १२ ते ३० दरम्यान असलेल्या उपासकांनी मोठ्या संख्येने श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होऊन धम्मदानाने लाभान्वीत व्हावे व श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होण्यासाठी ता. दोन जुलैपर्यंत भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो (8600844888), भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो (9823573551), भिक्खू संघपाल (9673361358), भिक्खू शीलरत्न (9960955463), इंजि. यशवंत गच्चे (8551078379), डॉ. मिलिंद भालेराव (8275344904) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनही महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

मोठी बातमी! माध्यमिक शाळांमध्ये आता कला-क्रीडा-संगीत शिक्षकांची भरती; राज्यात यंदा १८ हजार शिक्षकांची भरती; रिक्त पदे अपलोड करायला १० जुलैपर्यंत मुदत

उजनीत ८१ हजार क्युसेकची आवक! पुण्यातील पश्चिम घाटमाथ्यावर दमदार पाऊस, 3 दिवसांत ‘प्लस’मध्ये येण्याची शक्यता; गतवर्षी धरण 27 मे रोजी प्लसमध्ये, वाचा....

Daliya Laddu Recipe:फायबरने भरपूर अन् पचायला हलके , १५ मिनिटांत तयार करा पौष्टिक दलियाचे लाडू

Pune Heavy Rain : पुणेकर त्रस्त; यंत्रणा मात्र सुस्त, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला उशिरा जाग

SCROLL FOR NEXT