parking system sakal
नांदेड

नांदेडात पार्किंग व्यवस्थेची ‘ऐशी तैशी’!

पार्किंग नसताना बहुमजली इमारत बांधकामासाठी महापालिकेकडून परवानगी मिळते कशी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : शहराचे नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर अशा दोन दिशेला शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. असे असले तरी, शिवाजीनगर उड्डाणपुलाखाली दुचाकी पार्किंग व्यवस्था (parking system) सोडल्यास शहरातील कुठल्याही मुख्य रस्त्यावरील दुकानदार किंवा महापालिकेच्या वतीने वाहनांकरिता कुठलिही पार्किंग व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे पार्किंग व्यवस्था नसलेले व नियोजन शुन्य शहर म्हणून नांदेडची (Nanded) प्रतिमा तयार होत आहे.

राज्य सरकारने २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या निकशावर राज्यातील महापालिकेची वर्गवारी केली आहे. यात नांदेड वाघाळा महापालीकेस ‘ड’ गटाचा दर्जा प्राप्त आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहराला नियोजन व शिस्तबद्ध वाहतूक आराखड्याची गरज आहे. मोठ्या शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वतःच्या मालकीचे विविध दुकाने, आस्थापना, इंडस्ट्रीयल एरीया, शाळा, महाविद्यालय, रुग्णालये यांच्या इमारती उभारण्यापूर्वी त्यांना स्वतंत्र पार्किंग सुविधा असल्याशिवाय बांधकाम परवाना दिला जात नाही. त्यामुळे त्या मोठ्या शहरातील रस्त्यावर कुठेही वाहनपार्किंग होताना दिसत नाही.

नांदेड शहरात मात्र मुख्य रस्त्यावरील स्वतःच्या मालकीच्या दुकान मालकाने, आस्थापना, इंडस्ट्रील एरीया, रुग्णालयांच्या इमारतीमध्ये कुठलीही पार्किंग व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे नांदेड दक्षिणेचा भाग असलेल्या आसना नदी पुलापासून, विमानतळ रस्ता, राज कॉर्नर, शेतकरी चौक, छत्रपती चौक, मोर चौक, वाय पॉईंट, तर वर्कशॉप कॉर्नर, श्रीनगर, आयटीआय, भाग्यनगर, महात्मा फुले मार्केट, शिवाजी नगर, डॉक्टर लॉईन, वजीराबाद, बर्की चौक अशा अनेक मुख्य रस्त्यावरील रुग्णालय व दुकानदारांनी इमारत बांधताना पार्कींगची कुठलिही व्यवस्था केली नाही. तरी देखील महापालिकेकडून त्यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे.

त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानासमोर दुचाकी व चारचाकी सोबतच आॅटोरिक्षा वाल्यांकडून रस्त्यावर पार्किंग केली जात असल्याने सामान्य नागरीकांना पाई चालण्यासाठी देखील जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नांदेड वाघाळा महापालिकेने भविष्यातील वाढणारी शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन पार्किंगचे योग्य नियोजन करावे अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

शहरातील रस्ते मोठे आहेत परंतु भर रस्त्यात अतिशय वाईट पद्धतीने गाड्या पार्किंग केल्या जात आहेत. त्याचे योग्य नियोजन व्हावे. प्रत्येक दुकानदारांनी किमान त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी तरी जवळ कुठेतरी पार्किंगसाठी जागा विकत घ्यावी. असे झाले तरी शहरातील मुख्य रस्त्यावरील पार्किंग होणाऱ्या गाड्यांची संख्या कमी होईल व सामान्य माणसाला बिनदिक्कत चालता येईल.

- कोमल शिंदे, नागरीक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT