file photo  
नांदेड

‘झेडपी’ची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच!

नवनाथ येवले

नांदेड : सामज कल्याणअंतर्गत दलित वस्ती नियोजनावरून जिल्हा परिषद (झेडपी) चे राजकीय वातावरण चांगलेच तापले. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या निर्णयाला विरोध करत भाजपच्या सदस्यांनी सोमवारी (ता.१५) नियोजित ऑनलाइन सर्वसाधारण सभेवर अक्षेप घेतला. दरम्यान, कोरोनाचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने पदाधिकाऱ्यांसह सदस्य, पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकाऱ्यांना ऑनलाइन सर्वसाधारण सभेच्या नोटीस बजावल्या आहेत. 

सोशल डिस्टन्सिंगच्या आंमलबजावणीसाठी सभागृह तोकडे पडत असल्याचे कारण देत प्रशासनाकडून तालुका स्तरावर पंचायत समित्यांमध्ये मिनी कक्ष स्थापन केले आहेत. मुख्यालयामधील सभागृहातून पदाधिकारी, विभागप्रमुख गटस्तरावर जिल्हा परिषद सदस्य, तालुका स्तरावर पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. तांत्रिक अडचणींमुळे सदस्यांना पंचायत समिती कार्यालयातून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.

ऑनलाइन सर्वसाधारण सभेसाठी जिल्हा प्रशासनाने ॲप विकसित करून सदस्य पदाधिकाऱ्यांना ॲपद्वारे प्रश्न विचारता येणार आहेत. नियंत्रण कक्षातील पदधिकारी, विभाग प्रमुख प्राप्त प्रश्नांची उत्तरे, खुलासा सादर करतील. मागील सभेच्या इतिवृत्तासह सभा अहवालही सदस्यांना ॲपद्वारे सभा सुरू होण्यापूर्वी ठराविक वेळेत मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांसह ऐनवेळी घ्यावयाच्या निर्णयाबाबत सदस्यांची संमतीही ॲपद्वारे घेतली जाणार आहे. 

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीच्या हद्दपारीसाठी ग्रामीण भागात खबरदारीसह उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गावपातळीवर ग्रामपंचायत कार्यालयांकडून स्वच्छतेच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी औषधी खरेदच्या प्रमाणवाढीसह आरोग्य सुविधाचे निर्णयही सभागृहाला घ्यावे लागणार आहेत.  

प्रशासनाने शनिवारी ऑनलाइन सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर विभागप्रमुख, गटविकास अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्यासह पदाधिकारी, विभागप्रमुखांना संवाद साधण्यासाठी सभागृहामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे भाजप सदस्यांचा अक्षेप झुगारून सत्ताधारी महाविकास आघाडीकडून ऑनलाइन सर्वसाधारण सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

कोरोना महामारीचे गांभीर्य राखून पुणे, औरंगाबाद, परभणी जिल्हा परिषदांनी ऑनलाइन सर्वसाधारण सभा घेतल्या आहेत. विरोधाच्या जागी विरोध असावा, अशा संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सर्वसाधारण सभेचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्या अनुषंगाने ऑनलाइन सर्वसाधारण सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सोमवार होणारी ऑनलाइन सर्वसाधारण सभा सार्वांच्या हिताची ठरणार आहे. 
संजय बेळगे - सभापती अर्थ व शिक्षण जिल्हा परिषद, नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT