नांदेड : वाढदिवस साजरा करताना हजारो रुपयांचा केक कापून तो साजरा करण्याची प्रथा अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात रुढ झाली आहे. याला बगल देवून नांदेड शहरातील विठोबा नैसर्गीक भाजीपाला व फळे उत्पादक परिवारातील महिला सदस्या सविता पावडे यांचा वाढदिवस केक ऐवजी सेंद्रिय व नैसर्गिक फळे कापून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अशा पद्धतीने वाढदिवस साजरा झाल्यानंतर समाज माध्यमावर अनुकूल प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शेतकऱ्यांनी सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली फळे, भाजीपाला, शेतमाल थेट ग्राहकांना मिळावा. यातून शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही लाभ व्हावा,
हीच चळवळ अधिकाधिक गतिमान व्हावी, यासाठी गेल्या एक वर्षापासून विठोबा परिवार निरंतरपणे प्रयत्न करीत आहे. नैसर्गिक पद्धतीने शेतमाल
पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना एकत्रीत करुन त्यांनी उत्पादीत केलेला भाजीपाला, फळे, शेतमालाची शहरात विक्री व्हावी यासाठी या परिवाराती एकनाथराव पावडे निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून शेतकरी एकत्रीत आल्याने शेतीमालाचे मुल्यवर्धन होवून ग्राहकांनाही आरोग्यवर्धक शेतमाल मिळत आहे.
ही चळवळ आज संपूर्ण जिल्हाभर नव्हे तर मराठवाड्यात फोफावत आहे. ही शेतकरी चळवळ निरंतरपणे व अधिकाधिक पुढे जावी, गतिमान व्हावी यासाठी विठोबाने हा संकल्प केलेला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे या चळवळीला पाठबळ मिळत आहे. दरम्यान बुधवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विकेल ते पिकेल धोरणातंर्गत फळे विक्री स्टॉलचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपस्थित श्री चलवदे, श्री एकनाथराव पावडे यांनी शेतकऱ्यांपासून टरबूज, खरबूज, पपइ, मोसंबी, पेरु विकत घेवून विठोबा परिवारातील सदस्या
सविता पावडे यांचा त्याच दिवशी (बुधवारी) असलेल्या वाढदिवस केक एवजी फळे कापून साजरा करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी सविता पावडे यांचा हा अनोखा वाढदिवस फळे कापून साजरा केला. या अनोख्या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा उद्योग अधिकारी जितेंद्र देशमुख, जीएसटीचे सहायक आयुक्त एकनाथ पावडे, राजमुद्राचे संगमेश्वर लांडगे, प्रगतीशील शेतकरी प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर पावडे, दिलीप पावडे, उद्योजक उद्धव पावडे, प्रा. साहेबराव पावडे, वैशाली पावडे तथा परिवारातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान शेतकरी आणि ग्राहक दोघांचाही लाभ व्हावा, अशा भावनेने सुरु केलेल्या या उपक्रमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
समाजमाध्यमाच्या सर्वत्र पोचलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतूक करुन त्याचे अनुकरणही करण्यात सुरुवात केल्याची माहिती श्री पावडे यांनी दिली.
बारामती येथील सेंद्रीय शेतीचे पुरस्कृते प्रल्हाद वारे यांनीही या उपक्रमाचे कौतूक करुन राज्यात अशा प्रकाराचे प्रयोग यापुढे होतील असे सांगीतल्याचे ते म्हणाले.
येथे क्लिक करा - सव्वा तीनशे एकरवर तुतीची नोंदणी; जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या संकल्पनेतून रेशीम उद्योगाला चालना
मान्यवरांच्या प्रतिक्रिया
वाढदिवसाचा सोहळा अधिक पर्यावरणस्नेही करण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे. सध्या युवा वर्गामध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने फास्टफूडचा होणारा वापर चिंताजनक आहे. युवाशक्तीचे सशक्तीकरण व उर्जावाढीसाठी फळांची आवश्यकता आहे. युवावर्गापर्यंत अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा संदेश पोचविणे गरजेचे ठरेल.
- डॉ. परमेश्वर पौळ, पर्यावरण व जलतज्ज, नांदेड.
विठोबा परिवाराने नैसर्गिक भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी गेल्या वर्षभरात विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे. आमच्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यामध्ये सविता पावडे यांचा विशेष वाटा आहे. फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा विठोबा परिवारातील सर्वच सदस्यांनी पाळण्याचे ठरविले आहे. कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व समाजामध्ये आरोग्यभान निर्माण करण्यासाठी ‘विठोबा’चा हा उपक्रम यशस्वी ठरेल याची खात्री आहे.
- सतीश कुलकर्णी मालेगावकर, विठोबा चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता.
वृक्षमित्र चळवळीने पर्यावरणसमृद्धीसाठी विविध उपक्रम हाती घेत अनेक कार्यकर्ते जोडले आहेत. वृक्षमित्र चळवळीतील कार्यकर्ते यापुढील काळात
वाढदिवस साजरा करण्यासाठी फळांचाच समावेश करणार असून समाजातील विविध घटकांपर्यंत हा संदेश पोंचविण्यासाठी कार्यरत राहणार आहेत.
- संतोष मुगटकर, वृक्षमित्र चळवळीचे प्रणेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.