Paschim maharashtra Sakal
नवरात्र

शिक्षण दहावी ; बेकरी व्यवसायात भरारी

गीता जाधव यांची यशोगाथा ; महिलांसमोर प्रेरणादायी काम

अनिल पाटील

कोगनोळी : सुरुवातीच्या काळात अतिशय काटकसरीने संसाराला उभारी देणाऱ्या येथील गीता किरण जाधव यांनी बेकरी व्यवसायात भरारी मारली आहे. अवघ्या दहावीपर्यंत शिक्षण घेऊनही `बेकरी मॅनेजमेंट`चा भार त्या वहात आहेत. येथून रोज दहा-बारा कामगारांना रोजीरोटी देण्यात येत आहे. दिवसाकाठी २० ते २५ हजाराच्या घरात बेकरी पदार्थ उत्पादन व विक्रीद्वारे त्यांचा उद्योग प्रगती साधत आहे. चूल व मुल यातून बाहेर पडून वेगळी वाट या नवदुर्गेने धरली असून त्यांची यशोगाथा महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

पती किरण जाधव यांनी आपल्या बहिणीकडे बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला अतिशय लहान स्वरूपात बेकरी व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात हळूहळू जम बसू लागला. यामध्ये कुटुंबीयांनी त्यांना मोलाची साथ दिली. सध्या किरण जाधव व गीता जाधव यांच्याकडे दहा-बारा कामगार काम करत आहेत. सध्या या व्यवसायात त्यांनी भरारी घेतली आहे. कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यात त्यांच्या बेकरी पदार्थांना मोठी मागणी आहे.

सुरुवातीला घरामध्येच बेकरी व्यवसाय सुरु केला. हळुहळु कोगनोळी व परिसरातील खेडेगावात भरणाऱ्या बाजारात बेकरी पदार्थ विक्री सुरू झाली. यातूनच जम बसवत त्यांनी आता इलेिक्ट्रक भट्टीयासह आधुनिक यंत्रसामग्री बसविली आहे. बेकरीमध्ये तयार होणाऱ्या सर्व पदार्थांच्या उत्पादनावर देखरेख व मागणीनुसार पुरवठा यासह इतर गोष्टींची पूर्तता गीता जाधव या करतात.

सध्या परिसरामध्ये बेकरी पदार्थांना मोठी मागणी आहे. दिवसभरात सुमारे वीस ते पंचवीस हजाराचे बेकरी पदार्थ येथे तयार होतात. परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारासह होलसेल विक्रेत्यांकडे पदार्थ पाठवून देण्यात येतात.

किरण जाधव व गीता जाधव यांनी अनुकूल परिस्थितीमध्ये बेकरी व्यवसायात मारलेली भरारी कौतूकास्पद आहे. त्यामुळेच अनेक मान्यवर व तज्ज्ञ भेट देत आहेत.

जाधव दाम्पत्यांने बेकरी व्यवसायावर आपला मुलगा करण व मुलगी कादंबरी यांना उच्चशिक्षित केले. त्याच बरोबर सुमारे 40 ते 45 लाखाचा स्वतःचा आलिशान बंगला बांधला आहे. सासरे बाळासाहेब जाधव, सासुबाई शेवंता जाधव या देखील या बेकरी व्यवसायात मदत करत असल्याचे गीता जाधव यांनी सांगितले.

एक नजर...

*१५ ते २० लाखाची अत्याधुनिक मशिनरी

*रोज 10 ते 12 कामगारांच्या हातांना काम

*बेकरी पदार्थ वाहतुकीसाठी स्वतःची दोन वाहने

*दिवसभरात २० ते २५ हजाराच्या बेकरी पदार्थांचे उत्पादन

*खर्च वजा जाता रोज २ हजाराचा नफा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

Pune Transport Strike: टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात पाच मार्चपासून बेमुदत आंदोलन

Agra STF Encounter: एसटीएफचा 'धडाका'! शार्पशूटर गुंडाचा आग्र्यात एन्काउंटर; १० वर्षांपूर्वी लुटलेली सरकारी पिस्तूल अखेर जप्त

Devotional Journey: शेगाव वारीचा अलौकिक अनुभव! डोळे भरून दर्शन घेताच जीवन कृतार्थ झालं

Niphad Online Ration Card : जुनी रेशनकार्ड इतिहासजमा; आता घराघरात ई-शिधापत्रिका, गैरव्यवहाराला बसणार पूर्ण आळा

SCROLL FOR NEXT