Navratri 2022
Navratri 2022 esakal
नवरात्र

Navratri 2022 : नांगर घेऊनी हाती ‘ती’ने फुलवली शेती

सकाळ वृत्तसेवा

विसापूर : अवघ्या विसाव्या वर्षी आयुष्याचा जोडीदार कायमचा निघून गेला, तेव्हापासून आतापर्यंत अठरा वर्षे ‘ती’चा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यासाठी पर्यायाने नांगर धरावा लागला, शिवाळ खांद्यावर घ्यावं लागलं. प्रसंगी रोजगार करावा लागला. मात्र वयोवृद्ध सासरा आणि दोन मुलांना घेऊन ‘ती’ उभी राहिली.. ही कथा आहे, विसापूर येथील राणी संजय शिवणकर यांची.

वयाच्या २० व्या वर्षी २००४ मध्ये येथील संजय शिवणकर यांच्याशी विवाह झाला. त्या वर्षी आलेला दुष्काळ जीवनाचा संघर्ष करणारा ठरला. घरी चिमूटभर धान्य नाही, अशा अवस्थेत त्यांनी खोरे-पाटी घेऊन रोजगार हमीच्या कामावर जाणे पसंत केले आणि लग्नाचे माप ओलांडल्यानंतर त्यांचा रोजगार सुरू झाला. मुळातच घरचे अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. सोबतीला सासू नाही. अशा अवस्थेत दोन लहान लेकरं, सासरा आणि पती असा त्यांचा संसार सुरू झाला. पतीसमवेत शेतात राबायला सुरवात केली.

संसाराच्या रथाची चक्रे सुरळीत सुरू असतानाच त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. पती संजय निष्णात व पट्टीचा पोहणारा होता. कितीही खोल पाण्यातली बुडालेली वस्तू काढत होता. गावातील अशीच एकाची वस्तू विहिरीतून बाहेर काढण्यासाठी उतरला. खोच मारली, परंतु वर आलाच नाही. आले ते केवळ त्यांचे शव. पतीच्या अकाली जाण्याने राणी यांना मोठा धक्का बसला. अवघ्या या चार वर्षांचा संसार सुरू होण्याआधीच मोडला. त्यांचे माहेर जत तालुक्यातील जिरग्याळ.

काही दिवस भाऊ, आई त्यांच्याजवळ मुक्कामाला थांबले. ‘माहेरी चल, सांभाळ करतो,’ असे म्हणून दिलासा दिला. मात्र त्यांनी ठाम नकार दिला. काहींनी दुसरा विवाह करण्यास सांगितले. मात्र वयोवृद्ध सासरा आणि दोन लहान मुलांचे भवितव्य काय? त्यांची फरफट होईल म्हणून त्यांनी लग्नाला नकार दिला. काही दिवस विचार करण्यात गेले. अनेक दिवस विमनस्क अवस्थेत बसून राहिल्यानंतर जगण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे, असा विचार मनात आला आणि अखेर त्यांनी पदर खोचला, त्या उभ्या राहिल्या आणि सुरू झाला आणखी एक संघर्ष...

वयोवृद्ध सासऱ्‍याला सोबत घेऊन शेती करायला सुरवात केली. दोन एकर शेतात ऊस लावला, भाजीपाला केला. दावणीला बैलजोडी होती. दुर्लक्ष झालेल्या शेतीत बैलजोडी घेऊन अखेर त्यांनी नांगर धरला. शेती पिकविण्यास सुरवात केली. मुलं मोठी झाली. त्यांची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. साक्षी बारावीला, तर मुलगा सतीश अकरावी कृषिविज्ञान घेऊन शिक्षण घेत आहे. मुलीने ‘कृषी’मधून पदवी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. मुलगा मात्र चांगली शेती करण्याच्या इराद्याने कष्ट करतोय. सासरचीही चांगली मदत आहे. कुटुंबातील दीर, भावजय इतर मदत करतात. आता घर त्यांना बांधायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT