kolhapur news
kolhapur news esakal
नवरात्र

Navratri 2022 :अपघातानंतरही उभ्या राहीलेल्या पहिल्या महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे

Pooja Karande-Kadam

पुणे : गेली ३० वर्षे धैर्याने आणि चिकाटीने रिक्षाचालक म्हणून काम करणाऱ्या रेखा दुधाणे ताई सर्वांच्याच ओळखीच्या आहेत. पतीच्या निधनानंतर त्यांचीच रिक्षा शिकून त्यांनी संसार उभा केला. मुलांना शिक्षण दिले. त्यासोबत लोकांची सेवाही केली. एक वेगळी वाट निवडणाऱ्या रेखा दुधाणे यांचा प्रवास जाणून घेऊयात.

रात्रीची वेळ. मुंबईतून एक जोडपं कोल्हापूरच्या रेल्वेस्टेशनवर उतरलं. इतक्या अवेळी कोणतेही वाहन मिळेल याची शक्यता कमीच होती. आता आई अंबाबाईला जायचं कसं हा विचार करून ते गोंधळले होते. तेवढ्यात त्यांना एक रिक्षा दिसली. त्यांनी हाक दिली. रिक्षा सर्रकन त्यांच्या जवळ आली. ते जोडपं गाडीत बसलं. त्यांनी 'रिक्षावाल्याला' विचारलं 'तुम्ही सुखरूप पोहोचवाल ना आम्हाला' नाहीतर देवाच्या दारी जायच्या ऐवजी हॉस्पिटलची वारी करावी लागेल'. हे ऐकताच ड्रायव्हर उतरला.

साहेब, तुम्ही निश्चिंत बसा. तुम्हला शंका वाटली तर पैसे देऊ नका. सुखरूप पोहोचवेण मी तुम्हला. तरीही जीव मुठीत धरून त्या जोडप्यानं त्या रात्रीचा प्रवास केला. रिक्षा इच्छित स्थळी पोहोचताच.त्यांनी मीटर प्रमाणे पैसे दिले आणि वर 101 रुपयांचे बक्षीसही त्या हातावर टेकवले. ते रिक्षा चालवणारे हात माझे होते. मी महाराष्ट्रातील पहिली महिला रिक्षाचालक असणाऱ्या रेखा दुधाणे.

माझे लव्ह मॅरेज झालं आहे. मी पळून जाऊन लग्न केलं आहे. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे मला चांगले लोक भेटले. त्यामुळ आता मी जी काही आहे ते याचे श्रेय माझ्या आईने दिलेली संस्काराची शिदोरीलाच जाते. संपूर्ण आयुष्यात नशिबाने मला खूप काही दाखवलं. अनेक चांगले वाईट प्रसंग अनुभवले. तरीही खचून न जाता खडतर परिस्थितीतून मार्ग काढला.

माझ्या पतीच्या निधनाने मी खचले नाही. पदरात २ मुले होती. त्यांच्यासाठी मी पतीच्या १३ व्यालाच सर्व दुख: मागं टाकून पुन्हा एकदा उभी रहिले. त्या दिवशी रिक्षाला मारलेली किक आजही सुरुच आहे. पतीच्या निधनानंतर माझ्या दोन्ही मुलांनी मला मोलाची साथ दिली. मी पहाटे उठून रिक्षा घेऊन जायचे तेव्हा मुलं जेवण बनवून ठेवायची. आजही जर उशीर झाला तर माझा मुलगा जेवण बनवतो.

मी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले आहे. मोठ्या मुलाचे हात पिवळे केले आणि त्यानं वेगळ बस्तान मांडलं. मी अनेक नाती जोडली पण मला आपल्या लोकांपेक्षा परक्यानीच साथ दिली. माझा एक मानलेला मुलगा आणि त्याची पत्नी मला खूप जवळचे आहेत.

80 च्या दशकात जेव्हा महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण हे शब्दही समाजाला माहीत नव्हते त्या काळात मी रिक्षा चालवण्याचे आणि त्याचा परवाना मिळण्याचे काम केले. गेली ३५ वर्ष मी रिक्षा चालवते. फक्त परिस्तिथी हलाखीची होती म्हणून नव्हे तर आवड म्हणून मी हा 'पुरुषांची मक्तेदारी असलेला व्यवसाय केला. स्वतःचा संसार संभाळताना मला जमेल तसे इतर महिलांना सक्षम करण्याचे कामही मी करतेय.

मी ३५ वर्षांच्या प्रवसात अनेक बरे वाईट प्रसंग अनुभवले. मी रिक्षा काढायला सुरूवात केली तेव्हा काही रिक्षावाले महिला रिक्षा चालवते म्हणून माझी टिंगल करायचे. काहींनी तर दादागीरी करत मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. मी एक महिला आहे. ती काय बिघडवणार आपलं, हा विचार करून काही लोक मला स्टॉपवर गाडी लावायलाच देत न्हवते. पण त्यावरही मात करत मी त्याच रीक्षावाल्यांच्या ‘आरे’ ला ‘कारे’ करायचे.

महिला आरक्षण आहे म्हणून तुमचा नंबर आधी का?, महिला आहे याचा फायदा घेता का? असे अनेक टोमणे आजही ऐकावे लागतात. कोल्हापूर आपलं शहर आहे. काही लोक वाईट भेटले म्हणून मुली व महिलांनी स्वत:ला एकटे समजू नये. कोणी छेड काढतोय किंवा त्रास देतोय म्हणून तुम्ही एकट्या आहात अस समजू नका. एक आवाज दिलात तर चांगले लोक मदतीला येतील. सुरक्षेसाठी तुमच्याकडे एखादे हत्यारही बाळगावे, असे मला वाटते

चार वर्षांपूर्वी मला एका अपघात झाला. मी नेहमीप्रमाणे राजारामपुरीतून रिक्षा शिवाजी विद्यापिठाकडे वळवली. रिक्षात ४ विद्यार्थिनी होत्या. २ मुली राजाराम कॉलेजवर सोडल्या आणि मी विद्यापीठात गेले. रिक्षा नेहमीच्याच स्पीडने होती. पण काहीही कळायच्या आत रिक्षाला एका दुचाकीची जोरात धडक बसली. माझी रिक्षा ५० फूट फरफटत गेली. या अपघातात माझ्या हात आणि पोटाला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे काही वर्ष माझे काम बंद केले. पण, त्यातून पूर्ण रिकव्हर झाल्यावर मी पून्हा जोमाने कामाला लागले.

माझ्यासारखे अनेक महिला ज्यांना रिक्षा चालवायची असेल त्यांना मी रिक्षा चालवायला शिकवते. त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहायला रिक्षा नक्कीच मदत करेल. एका मराठी टीव्ही सिरीअलमध्ये तरूणी रिक्षा चालवते, त्यांच्या हक्कासाठी झटते हा सकारात्मक बदल आहे. नुकतेच मी त्या सिरीअलच्या सेटवर तिला भेटले तेव्हा तिच्याशी बोलून मला अजूनच समाधान वाटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खरंच वीस दिवसांमध्ये NDA मध्ये येतील का? आमदाराचा नेमका दावा काय?

Ind vs Ire T20 WC24 : 5 जूनला भारत-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द तर… कोणाला होणार फायदा?

Share Market Today: आज शेअर बाजारात काय होणार? इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल?

World Bicycle day 2024: या देशाचे पंतप्रधान मर्सिडीज-BMW तून नाही, तर सायकलने जातात संसदेत, संपूर्ण देश आहे सायकलप्रेमी

Latest Marathi News Live Update: विरार ते दहिसर मार्गावर प्रचंड गर्दी

SCROLL FOR NEXT