Navratri 2022
Navratri 2022  Esakal
नवरात्र

Navratri 2022: असुरांचा नायनाट करणाऱ्या षष्ठदुर्गा श्री महाकालीदेवीचा इतिहास..

सकाळ डिजिटल टीम

आई अंबाबाईचे वास्तव्य असल्याने कोल्हापूर धार्मिक पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध आहे. कोल्हापुरातील नवदुर्गांची मंदिरे ही बघण्यासारखी आहे. नवरात्रीच्या काळात अनेक महिला या नवदुर्गांच्या दर्शनासाठी जातात. पण कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांना या नवदुर्गा मंदिरांची पुरेशी माहिती नाहीये. 

कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठेतील महाकाली मंदिराच्या परिसरामध्ये जुना आणि ऐतिहासिक बाज अजूनही टिकून आहे. कोल्हापूरची जी काही रांगडी ओळख आहे ती अजूनही शिवाजी पेठेने जपलेली आहे. आणि या शिवाजी पेठे मधील श्री महाकाली मंदिर आणि देवीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आपण जाणून घेणार आहोत.

शिवाजी पेठेतील महाकाली मंदिर नवदुर्गांच्या परिक्रमेमधील सहावे मंदिर आहे. देवीची ३ फूट उंचीची, काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. जेंव्हा असूरांनी संहाराचा अतिरेक केला, तेव्हा सर्व देवांनी मिळून दुर्गेची आराधना केली. 

दुर्गेने असुरांचा नायनाट करून मानवाला अभय दिले. ही महाकालाची पराक्रमी शक्तीदेवता आहे. तामसगुणांची असल्याने आद्यशक्ती विश्वरूपी रौद्ररूपी आहे. मूर्तीसमोर छोटेसे अमृतकुंड आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला पाच फणीची नागमूर्ती आहे. डाव्याबाजूला एक फणाचा नाग आहे. मंदीरातील गाभारा व त्याबाहेर मोठा सभामंडप आहे. मुर्तीसमोर पितळी धातुचा उंबरठा आहे. मंदिराच्या आवारात मोठी घंटा बांधण्यात आली आहे.

अतीप्राचीन असे हे दैवत बंगालमध्ये प्रमुख उपास्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे. ही नाथपंथियांचेही प्रमुख दैवत आहे. हिचे स्वरूप विरक्तीपूर्ण व लयाच्या प्रतीकाने युक्त असते, ही मायेची लय करून विशुद्ध आत्मज्ञान देते. या देवीचे परिवार देवता म्हणून देवी, महादेव, दत्त, हनुमंत व सर्व नाथपंथीय सिद्ध पुरूषांच्या पवित्र समाधी आहेत. अशी माहिती इतिहास अभ्यासक शरद तांबट यांच्या करवीक नवदुर्गा या पुस्तकात आहे. 

या आहेत नवदुर्गा

कोल्हापुरात अंबाबाई मातेच्या दर्शनासोबतच नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. यामध्ये एकांबिका (एकविरा देवी), मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) पद्मांबिका (पद्मावती देवी), प्रियांगी देवी (फिरंगाई) , कमलजा (कमलांबिका देवी), महाकाली (कलांबिका देवी) , अनुगामिनी (अनुगाई देवी), गजलक्ष्मी (गजांबिका देवी), श्रीलक्ष्मी यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT