Kelapur Esakal
नवरात्र

Navratri 2022: केळापूरच्या स्वयंभू प्रगटलेल्या श्री जगदंबा देवीचा इतिहास

कुंतलापुरची भवानी म्हणूनही देवीचा पुराणात उल्लेख आहे. 

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 म्हणजे परवापासून ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे.

या वर्षीच्या नवरात्रीचे औचित्य साधून दररोज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध  अशा देवीच्यां मंदिराचा इतिहास पाहणार आहोत चला तर मग आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील श्री जगदंबा संस्थान या मंदिराचा इतिहास पाहणार आहोत  

विदर्भ आणि तेलंगाना च्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात केळापूर या ऐतिहासिक गावात ‘आई जगदंबा’चे मंदिर आहे. धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या देखील केळापूरला विशेष महत्व असून वर्षभर येथे जगदंबा आईचा उदो उदो सुरु असतो.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून 4 किमी अंतरावर केळापूर हे गाव आहे. गावात खुनी नदीच्या काठी, आणि वनसंपदेने बहरलेल्या परिसरात आई जगदंबेचे प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. कुंतलापुरची भवानी म्हणूनही देवीचा पुराणात उल्लेख आहे. जेमिनी अश्वमेध या ग्रंथात कुंतलापूर ची भवानी व राजा चंद्रहास यांची कथा आहे. चंद्रहास राजाचे हे नगर होत आणि राजावर प्रसन्न होऊन जगदंबेने कुंतलापूर गावात आपला कायमचा निवास ठेवला.

अशी आख्यायिका या ग्रंथात आहे. सुप्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकात 1818 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अज्ञातवासात असतांना केळापूर येथे आश्रय घेतल्याचा उल्लेख आहे.  इतिहासात केळापूर ही गोंड राजाची राजधानी असल्याचा पण उल्लेख आहे. आजही जीर्ण व पडझड झालेल्या पुरातन किल्याचे अवशेष नदीकाठावर आढळून येतात.

मंदिराच्या गाभाऱ्यात आई जगदंबेची लोभस मूर्ती आहे. ही मूर्ती स्वयंभू प्रगटलेली आहे. मूर्तीच्या जागेवर 2 बाण आहेत. जीर्णोद्धार कार्य  सुरु असतांना जी मूर्ती सापडली ती भग्न असून चतुर्भुज जगदंबेच्या मांडी खाली राक्षस आहे. आईच्या एकां हातात त्रिशूल असून ती राक्षसाचा वध करीत आहे. देवीवर भक्तांची प्रचंड श्रद्धा असून औरंगाबाद येथील भक्तांने तर एक किलो सोने देवीला दान चढविले. विश्वस्तांनी त्याचा वापर करून देवीचा मुखवटा बनविला आहे

जगदंबेवर आंध्र व तेलंगणातील भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. देवीला नवस बोलून लाखो भक्त अनवाणी पायाने चालत नवरात्री दरम्यान दर्शनाला येतात. या काळात मंदिरामध्ये अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलीत करण्यात येते.  या प्राचीन मंदिराची 1981 पूर्वी पारवेकर घराण्यांमार्फत देखभाल व्हायची. त्यानंतर पांढरकवडातील तरुणांनी एकत्रित येवून एकता मंडळ जीर्णोद्धार समितीची स्थापना केली.   

केळापूर गावात प्राचीन चतुर्मुखी गणपतीचे देखील मंदिर आहे. गावात असलेल्या या मंदिरातील गणपतीची अनोखी मूर्ती लोभस आहे. चारही दिशांना गणपतीचे मुख असून गोंड राजाच्या वास्तव्य काळात या चतुर्मुखी गणपतीची स्थापना झाल्याची आख्यायिका आहे. केळापूर गाव  बारा हनुमानसाठी देखील ओळखले जाते. गावात मध्यभागी व वेशीवर हनुमान मंदिर आहे. बाजीराव पेशवाच्या युद्धानंतर काही मूर्ती आसपासच्या गावात स्थापित करण्यात आल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT