Sayli-Gurjar 
नवरात्र

Navratri Festival 2019 : फॅशन डिझायनिंगकडे वाटचाल (व्हिडिओ)

नीला शर्मा

आर्किटेक्‍ट म्हणून कार्यरत असलेल्या सायली गुर्जर या तरुणीला पारंपरिक सुती कापडांपासून फॅशनेबल ड्रेस डिझायनिंगचा छंद जडला. बघता बघता याचं तिनं लघुउद्योगात रूपांतर करत झोकदार भरारी घेतली. ड्रेस मटेरिअल म्हणून कापडावर स्वतः ब्लॉक प्रिंटिंग करणं, ते इतरांना शिकवणं असा तिनं व्यवसायाचा केलेला विस्तारही कौतुकास्पद आहे.

‘मॅड कट्टा’ अशा हटके नावाने ड्रेस डिझायनिंगचा स्टुडिओ दिसला, की लोकांचं कुतूहल जागृत झाल्याशिवाय राहत नाही. आत गेल्यावर ब्लॉक प्रिटिंगची कार्यशाळा दिसल्यावर आपलं कुतूहल वाढतं. सायली एकावेळी एकीलाच शिकवत असते. या कलेकडे गांभीर्याने पाहण्याची तिची दृष्टी यातून लक्षात येते. 

सायली म्हणाली, ‘‘ब्लॉक प्रिंटिंग ही भारतातील पुरातन कला आहे. निरनिराळ्या आकाराचे ठसे बनवून, ते रंगात बुडवून कापडावर ठसवले जातात. मी राजस्थानमधील बगरू या गावी जाऊन हे शिकले. कच्छकडील अजरक, कर्नाटकमधील कलमकारी, इकत अशा हाताने छपाई केलेल्या कापडांनी मला मोहून घेतल्यामुळे मी यात ओढली गेले. दहा वर्षे केलेलं आर्किटेक्‍टची प्रॅक्‍टिस सोडून मी यातल्या प्रयोगात रमू लागले.’’

सायलीने सांगितलं, की माझी आई आणि तिचीही आई कपडे शिवण्यात तरबेज होत्या. मी ते पाहत मोठी झाले. ती काही जणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिवणकाम शिकवायची. मलाही तिच्यासारखं करावंसं वाटायचं. मी आठवीत असताना माझ्या थोरल्या बहिणीला जुळं झालं, तेव्हा मीच बाळंतविडा तयार केला होता. पुढे मी आर्किटेक्‍ट झाले तरी ड्रेस डिझायनिंगची आवड होतीच. लग्नानंतर सासूबाईंनाही कपड्यांची आवड जोपासताना पाहिलं. त्या आणि मी मिळून प्रांतोप्रांतीच्या पारंपरिक कलात्मक सुती साडीविक्रीचा व्यवसाय करतो. कात्रज-आंबेगाव परिसरात घरातूनच हा व्यवसाय चालवतो. मी तयार केलेले टॉप्स, प्लॉजो, जाकिटं तिथेच विक्रीला ठेवले आहेत. कर्वेनगरमध्ये माझा डिझायनिंग स्टुडिओ आहे. इथंच मी ब्लॉक प्रिंटिंग करते आणि शिकवते. ड्रेस शिवताना त्याला शोभणाऱ्या छोट्या बॅग्ज, पाऊचसुद्धा मी तयार करते. एवढंच नाही तर योग्य असे दागिनेही बनवते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

आजचे पंचांग 06 ऑक्टोबर 2026! इंदिरा एकादशी, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि आजचे चंद्रबळ जाणून घ्या

Marathi News Live Updates: आसाममध्ये पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का; ४.५ रिश्टर तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

SCROLL FOR NEXT