Banana Raita Esakal
नवरात्र

Navratri Recipe: केळीचा रायता कसा तयार करायचा ?

हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात.बऱ्याच जणांना नवरात्रीत नऊ दिवसाचे उपवास असतात.मग उपवासाला वेगवेगळ्या प्रकारचे फराळ करावे वाटतो त्यामुळेच आज आम्ही तुमच्याकरता एक खास फराळाचा पदार्थ  घेऊन आलो आहोत चला तर मग बघू या केळीचा रायता कसा तयार याची रेसिपी..

साहित्य

1.तिन पिकलेली केळी

2. अर्धा वाटी वाळलेले बारीक खोबरे

3. एक लिंबू

4. एक वाटी साधे दही

5. बारीक कापलेले बदाम एक चमचा

कृती:

वाळलेले बारीक खोबरे कोरडेच तांबुस होईपर्यंत भाजून घ्यावे.

नंतर केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करावे. त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.

त्या कापांमधे दही, खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा. झाला तुमचा रायता तयार.

तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.

हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT