navratri festival news
navratri festival news  esakal
नवरात्र

Navratri Travel : नवरात्रीत वैष्णो देवी यात्रेला जाताय; मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

सकाळ डिजिटल टीम

रोजच्या कामाच्या धावपळीतून वेळ काढून एखाद्या ठिकाणी जायचं ठरलं तर, आपण त्या ठिकाणाच्या आसपासची ठिकाणे फिरून येतो. तसेच, यंदाच्या नवरात्रित तूम्हीही माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार असाल तर, जवळपास असलेल्या या अद्भुत ठिकाणांनाही भेट द्या.

हिंदू धर्मात वैष्णोदेवी यात्रेला खूप महत्त्व आहे. येथे अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणूनच माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी नवरात्रित दरवर्षी लाखो भाविक जमतात. यंदा नवरात्री 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान असून दसरा 5 ऑक्टोबर रोजी विजया दशमी दसरा आहे. जाणून घेऊयात माता वैष्णोदेवी मंदिराजवळील काही इतर पर्यटनस्थळे 

● पटनीटॉप

जम्मू-काश्मीरमधील हिल स्टेशनपैकी एक असलेल्या पटनीटॉपला नैसर्गाची अद्भुत देण लाभली आहे. माता वैष्णोदेवीच्या मंदिरापासून 85 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पटनीटॉपमध्ये तुम्हाला देवदार वृक्षाची जंगले आणि उंच पर्वतरांगा पहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंगसह अनेक साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. पटनीटॉपमध्ये हिवाळ्यात बर्फवृष्टी होते.

● सनसर

सनसर हे जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. जे कटरापासून सुमारे 105 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही पॅराग्लायडिंग, बोट राईड आणि रॉक क्लाइंबिं

● बटोत

कटरा पासून सुमारे 80 किलोमीटरवर हे चिनाब नदीच्या काठावर बटोत वसलेले आहे. हे हिल स्टेशन विलोभनिय असून  पर्यटकांमध्ये प्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक आहे. नदीच्या काठावर बसून विश्रांतीचे क्षण घालवण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. तुम्ही इथल्या जंगलात कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करू शकता. 

● झज्जर कोटली

हे ठिकाण त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. माता वैष्णो देवी मंदिर परीसरातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानले जाते. जम्मू आणि काश्मीरमधील हा एक प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. येथे तुम्हाला ऍडव्हेंचर गेम करायला मिळतील. झज्जर कोटली कटरापासून पासून 30 किमी अंतरावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT