Navratri 2022 esakal
नवरात्र

Navratri 2022 : देवी उपासना करताना या नियमांचे पालन करा; इच्छीत फळ प्राप्त होईल

सकाळ डिजिटल टीम

Sharadiya Navratrotsav 2022 : शारदीय नवरात्रोत्सावत कुलस्वामिनीचे मोठ्या भक्ती-भावाने घरोघरी पुजन केले जाते. या काळात कुमारिकापुजन, कुळाचार, व्रतवैकल्ये केली जातात. याचबरोबर नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे. सप्तशती पाठासह नवरात्रात देवीच्या उपासनेचे विशेष महत्व आपण धर्म अभ्यासकांकडून जाणून घेवूया.

(Shardiya Navratri 2022 Durga devi puja importance of saptashti path and rituals rules during Navratra)

नवरात्रात सप्तशती पाठ व देवीची उपासना कशी करावी, त्याचे महत्व काय यावर धर्म अभ्यासक पं. नरेंद्र धारणे सांगतात, सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे अग्नीसमान आहे. मार्कंडेय पुराणात देवी असे म्हणते, की जो मनुष्य माझे माहात्म्य श्रवण करील त्या मनुष्याच्या सर्व पीडा मी हरण करीन. स्वप्न- उग्र अशा ग्रहपीडा प्राप्त असता सप्तशती पाठ केल्याने त्या दूर होतील असे देवी माहात्म्य सांगते. राहुकाळात सप्तशती पाठाचे विशेष महत्व सांगितले आहे. अश्विन महिन्यातील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते. तसेच त्या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या तिथीस महाअष्टमी म्हणतात.

Navratri 2022

नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कनकधारा स्तोत्र, रामरक्षा, देव्यपराध स्तोत्र, श्रीसूक्त, शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे व जमल्यास पुढील नियम पालन करण्याचा प्रयत्न करावा.

1)सात्विक अन्नाचे सेवन (शक्यतो परान्न वर्ज्य करावे)

2) ब्रम्हचर्य पालन

3) दाढी व कटिंग करू नये

4) गादीवर, पलंगावर न झोपणे.

नवरात्र नियमांचे पालन जेवढे अधिक तेवढा भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होतो असेही ज्योतिषाचार्य पं. डॉ. नरेंद्र धारणे सांगतात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT