Navratri 2022  Esakal
नवरात्र

Navratri Puja: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत 'या' गोष्टींची काळजी घ्यावी?

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात.

सकाळ डिजिटल टीम

पंचांगानुसार, शारदीय नवरात्री दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावल्या जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पठणही करतात. यावर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरी केली जाणार आहे. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना (Ghatsthapana) म्हणतात. या दिवशी देवीची पूजा केल्याने जीवनात यश, आनंद आणि समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं. त्यामुळे घरात घटस्थापना करून व्रत केलं जातं. नवरात्रीच्या उपवासादरम्यान कडक शिस्तीचं (Strict discipline) पालन करावं लागतं.

नवरात्रीच्या या नऊ दिवसांशी संबंधित अनेक परंपरा प्रचलित आहेत. अनेक जण या कालावधीत अखंड नंदादीपही तेवत ठेवतात. प्रत्येकाची इच्छा असते, की देवीची पूर्ण भक्तीने पूजा करावी, जेणेकरून कुटुंबात सुख आणि शांती राहील. या 9 दिवसांत काय करावं आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, याबद्दलची सर्वसामान्य माहिती जाणून घेऊ या.नवरात्रीमध्ये दररोज देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. असं केल्याने इच्छा पूर्ण होतात.

तुम्ही नवरात्रीला 9 दिवस उपवास करू शकत नसाल, तर नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा आणि देवीची पूजा करावी. या 9 दिवसांत घरात स्वच्छता ठेवली पाहिजे. नवरात्रीत कुमारिका भोजन नक्की करावं. यामुळे घरात अन्नाची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं.या गोष्टी लक्षात ठेवा.

● धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात मांसाहार करू नये. तसंच लसूण, कांदा आणि अल्कोहोलचं सेवन करू नये.

● नवरात्रीत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी.

● घरी आलेल्या पाहुण्यांना आणि भिक्षेसाठी आलेल्या व्यक्तीला आदराने अन्न अर्पण करावं.

● यामुळे माता भगवती प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते.

● उपवास करणाऱ्या व्यक्तीने चामड्यापासून बनवलेल्या वस्तू वापरू नयेत.

● दुर्गा मातेची आरती करावी.

● पूजेदरम्यान काही चूक किंवा कमतरता असल्यास ती आरतीद्वारे पूर्ण होते, असं मानलं जातं.

● नवरात्रीच्या काळात पूजेसाठी देवीच्या भंग झालेल्या मूर्तीचा वापर करू नये.

● उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. स्वच्छ कपडे घालावेत आणि दररोज आंघोळ करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

SCROLL FOR NEXT