Dasara shastra puja esakal
नवरात्र

Dasara Puja 2022 : जाणून घ्या दसऱ्याला शस्त्र पुजन का महत्वाचे; होतील हे लाभ

सकाळ डिजिटल टीम

Dasara Puja 2022 : शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या दसऱ्या सणाची तयारी सर्वत्र जल्लोषात सुरु झाली आहे. यादिवशी सामर्थ्य आणि सद्भाभावनेचे प्रतीक असलेल्या मर्यादापुरोषोत्तम श्री रामाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत दृष्ट शक्तींचा नाश व्हावा म्हणून बहुज्ञानी मात्र दृष्ट विचारांच्या रावणाचे दहन केले जाते. या दिवशी शस्त्र पुजनाला विशेष महत्व आहे. दसऱ्याला असलेले शस्त्र पुजनाचे महत्व आपण जाणून घेवूया.

(Spiritual Importance of weapon worship Shastra puja on Dussehra)

...म्हणून दसऱ्याला शस्त्र पुजन महत्वाचे

भारतीय संस्कृती नेहमीच शौर्य आणि पराक्रमाची समर्थक राहिली आहे. प्रभु श्री रामाने रावणाच्या लंकेत जावून मोठ्या शौर्याने रावणाचा वध केला. मात्र असे केल्यानंतर लंकेत स्वतः राजा न होता राक्षसवंशी व रावणाचा भाऊ असणाऱ्या बिभीषणाला लंकेचा राजा केले. यातून प्रभु श्री रामांच्या सामर्थ्य आणि सद्भाभावनेचे दर्शन होते. याच शौर्याचे प्रतीक म्हणून शस्त्र पुजन केले जाते.

क्षत्रिय समाज हा सण शौर्याच्या रूपाने साजरा करतात. या सणावर क्षत्रिय समाजातील लोक शस्त्रांची पूजा करून समाजातील कुप्रथा दूर करण्याची प्रतिज्ञा घेतात. आपल्यातील अविचारांचा नाश होऊन सुविचारांनी आयुष्याचे सार्थक व्हावे यासाठी दसऱ्याला शस्त्र पुजन अवश्य करावे.

जाणून घ्या शमी पुजेचे महत्व

या दिवशी दुर्योधनाने पांडवांना जुगारात पराभूत केले आणि त्यांना 12 वर्षे वनवास अन् एक वर्षाच्या अज्ञातवासात पाठवले. वनवासात असताना अर्जुनाने शमीच्या झाडावर धनुष्य ठेवले आणि शमीच्या झाडावरून शस्त्रे उचलून शत्रूंवर विजय मिळवला. याच विजयाचे प्रतीक म्हणून विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला शमीची केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! निवडणूक आयोगाविरोधात विरोधक मैदानात उतरणार, १ नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

Rohit Sharma ने वडापाव सोडला, तीन महिन्यांची न थकता ट्रेनिंग! ११ किलो वजन कमी करण्यामागचं गुपित अभिषेक नायरने उलगडलं

Crime News : किरकोळ वादातून चाकू हल्ला आणि खून! फरारी आरोपी राजूचा ११ वर्षांपूर्वीचा थरार; संजय पिसेंची यशस्वी उकल

Nashik Crime : ५० लाखांची लाच मागितली! नाशिकच्या सेंट्रल जीएसटी अधीक्षकाला सीबीआय कडून अटक, तात्काळ निलंबित

Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मीपूजनाच्या या मंगल क्षणी... प्रियजनांना पाठवा लक्ष्मीपूजनाच्या मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

SCROLL FOR NEXT