100 crore from grape exports in Sangli district due to corona infection
100 crore from grape exports in Sangli district due to corona infection 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात कोरोना संसर्गातही द्राक्ष निर्यातीतून 100 कोटी 

विष्णू मोहिते

सांगली ः सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा संसर्ग, निर्यातीसाठी केंद्र सरकारने बंद केलेले अनुदान, वाहतूक खर्चात झालेली वाढ या परिस्थितीतही यंदा द्राक्ष निर्यात होणार का?, याची चिंता लागली होती. युरोपसह अन्य देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही सांगली जिल्ह्यातून मे अखेर 16 हजार 329 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. येत्या आठ-दहा दिवसात होणारी निर्यात लक्षात घेतली तर किमान दराने शेतकऱ्यांना 100 कोटींहून अधिक रक्कम मिळणार आहे. गेल्या महिन्याभरात निर्यात वाढल्याने हंगाम सांगतेत स्थानिक बाजारातील दर तेजीत आहेत. पेटीचा दर 200 रुपयांवर पोहोचला आहे. 


गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीतून निर्यातक्षम द्राक्षाचे शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन केले. यंदा विलंबाने निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम सुरू झाला. जिल्ह्यातून युरोपीय देशांसह रशिया, आखाती देशांत द्राक्ष निर्यात सुरू आहे. जिल्ह्यातून युरोपीय देशात 610 कंटेनरमधून 8 हजार 136 टन व आखाती देशात 581 कंटेनरमधून 8 हजार 193 टन द्राक्षाची निर्यात झालेली आहे. गतवर्षी हंगामाच्या तुलनेत निर्यातीत दीडशे कंटेनरनी कमी असली; तरी येत्या तीन आठवड्यांत गेल्यावर्षी एवढी निर्यात शक्‍य आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी 2 हजार 235 शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी करून 1177 हेक्‍टरवरील द्राक्षे निर्यात केली होती. यंदा निर्यातक्षम द्राक्षाच्या नोंदणीत वाढ झाली आहे. यंदासाठी 4211 शेतकऱ्यांनी 2267 हेक्‍टर वरील द्राक्ष निर्यातीसाठी नोंद केली आहे. 


निर्यातक्षम द्राक्षाचे सरासरी एकरी उत्पादन 12 ते 14 टन इतके मिळते. परंतु या गेल्यावर्षीच्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यंदा एकरी उत्पादन 10 ते 12 टन इतके मिळत आहे. 2 ते 3 टनांनी उत्पादनात घटले आहे. गेल्यावर्षी निर्यातक्षम द्राक्षास प्रतिकिलोस 95 ते 110 रुपये असा दर मिळाला. यंदा दर चांगले मिळतील अशी आशा होती. मात्र, केंद्राकडून द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यातच कंटेनरच्या भाड्यातदेखील वाढ झाली. त्याचा परिणाम निर्यातक्षम द्राक्षावर झाल्याचे उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा द्राक्षाला युरोपसाठी प्रतिकिलोला 55 ते 60 आणि आखाती देशात 45 ते 55 रुपये असा दर मिळतो आहे. 

द्राक्ष निर्यातीची स्थिती 

निर्यात सन 2019-20  सन 2020-21 1
देश कंटेनर टन कंटेनर टन
युरोप 639 8484 610 8136 
आखाती 698 9767 581 8129
एकूण 1337 18254 1191 16329 

यंदाची ठळक निर्यात (टनात) 

  •  नेदरलॅंड- 5091 
  •  यु. के.- 1846 
  •  नॉर्वे- 252 
  •  जर्मनी- 268 
  •  फिनलॅंड- 308 
  •  कॅनडा- 869 
  •  चीन- 1650 
  •  ओमान-823 
  •  रशिया- 696 
  •  सौदी अरब- 2309 
  •  युएई- 913 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT