Akhil Bharatiya Natya Parishad esakal
पश्चिम महाराष्ट्र

Natya Sammelan : 100 व्या नाट्य संमेलनाला आजपासून सांगलीत सुरुवात; 'या' बड्या नेत्यांसह नाट्यकलाकार, अभिनेते राहणार उपस्थित

शंभरावे नाट्य संमेलनाला आजपासून (ता. २९) नाट्यपंढरी सांगलीत सुरुवात होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

संमेलनाला ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी व १०० व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत.

सांगली : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे (Akhil Bharatiya Natya Parishad) आयोजित शंभरावे नाट्य संमेलनाला आजपासून (ता. २९) नाट्यपंढरी सांगलीत सुरुवात होत आहे. सकाळी साडे आठ वाजता मुहूर्तमेढ पूजन होणार आहे. त्यासाठी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्यासह नाट्य परिषदेचे मान्यवर, नाट्यकलाकार, अभिनेते व नेत्यांची मांदियाळी अवतरणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाला मुहूर्त लागत नव्हता. नाट्य परिषदेची निवडणूक होऊन नवी कार्यकारिणीनंतर हालचालींनी वेग घेतला. त्यानुसार आज नाट्यपंढरीत प्रारंभ अन् राज्याची राजधानी मुंबई-रत्नागिरीत समारोप असे ढोबळ सूत्र नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी जाहीर केले.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत तारखा निश्चित झाल्या. त्यानुसार नाट्यपंढरीत दोन दिवस कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले. संमेलनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजे आज संध्याकाळी भावे नाट्यमंदिरात ‘संगीत मंदारमाला’चा प्रयोग झाला. मुंबईच्या संगीतभूषण राम मराठे फौंडेशन आणि कलाभारतीच्या संस्थेच्या कलावंतांनी सादर केलेल्या या प्रयोगाला रसिकांची मोठी दाद मिळाली. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता भावे नाट्य विद्यामंदिरात उद्योजक गिरीश चितळे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन होईल.

आमदार सुधीर गाडगीळ या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी व १०० व्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मराठी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असेल. पुढील सहा महिने राज्यभरात संमेलनाचे विविध कार्यक्रम होत आहेत.

नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा

नाट्य परिषदेतर्फे १५ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ‘नाट्यकलेचा जागर’ स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख बक्षिसांसह शतकमहोत्सवी नाट्य संमेलनात सादरीकरणाची संधी मिळणार आहे. प्राथमिक, उपांत्य व अंतिम फेरी असे स्पर्धेचे स्वरूप आहे. एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन अशा स्पर्धा राज्यस्तरावर होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT