11 Crore Fraud In GIC Finance Company Kolhapur Marathi News
11 Crore Fraud In GIC Finance Company Kolhapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक ! फायनान्स कंपनीची 11 कोटीची फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जी. आय.सी. हौसिंग फायनान्स कंपनीच्या कोल्हापुरातील शाखेच्या तत्कालिन व्यवस्थापकाने अकरा कोटींची फसवणूक केली आहे. अशी तक्रार शाहूपुरी पोलिसात नोंद झाली आहे. फ्लॅटधारक, एजंट, व्हॅल्युएटर अशांना हाताशी धरून त्याने हा प्रकार केला आहे. असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. मिनू मोहन असे त्या संशयित महिला व्यवस्थापकेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्यासह 51 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला. याबबतची फिर्याद शाखा व्यवस्थापक अमित विलास देसाई (वय 40, रा. कराड) यांनी दिली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, जी. आय. सी. हौसिंग फायनान्स कंपनीची दाभोळकर कॉर्नर येथे शाखा आहे. या शाखेत 2015 ते या वर्षापर्यंत तत्कालिन व्यवस्थापक म्हणून मिनू मोहन ही महिला काम पाहत होती. या काळात कराड शहर व परिसरातील 11 इमारतीमधील प्लॅटसाठी गृहकर्जाचा पुरवठा फायनान्स कंपनीने केला होता. यात तत्कालिन व्यवस्थापक मिनू मोहन, विकासक, सदनिकाधारक, व्हल्युएटर, एजंट या सर्वांनी संगणमताने खोटी कागदपत्रे तयार केली. त्याचे खोटे व्हॅल्युएनशन रिपोर्ट तयार केले. त्याआधारे कंपनीतून त्यांनी गृहकर्जांची उचल केली. संबधित कर्जे थकबाकीत गेल्यानंतर याची तपासणी नुतन शाखा व्यवस्थापक अमित देसाई यांनी केली तेव्हा हा प्रकार यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबतची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. तब्बल दोन महिन्याच्या चौकशीनंतर कंपनीला तारण दिलेली मिळकती पेक्षा अधिकचे कर्ज घेऊन 11 कोटीची कंपनीची फसवणूक केल्याचे पुढे आले. त्याआधारे देसाई यांनी शाहूपुरीत फिर्याद दिली. त्यानुसार संबधित तत्कालिन व्यवस्थापक मिनू मोहनसह 51 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नांवे अशी - 

तत्कालिन व्यवस्थापक मिनू मोहन यांच्यासह संतोष शंकर जांभळे, मंगल मधुकर जाधव, कल्पना प्रकाश आंबिके, सर्जेराव भास्कर पाटील, श्रीकांत नारायण माने, शितल दयानंद चव्हाण, गिता अशिष थोरात, राजाराम कृष्णा नलवडे, नाथा राजाराम पाटील, शेखर शिवाजी मोरे, फ्लॅट धारक - दयानंद मोहन चव्हाण, बाळकृष्ण दत्तात्रय मोरे, रामदास गोरखनाथ जाधव, श्रीकांत महादेवराव जाधव, शंकर धोंडीबा चव्हाण, अभयसिंह विठ्ठल भोसले, प्रभाक्ती अरविंद कोळी, अभिजित राजेंद्र पाटील, हणमंतराव साहेबराव चव्हाण, अनुज वसंतराव पाटील, दिपक बाबुराव हिंदूले (सर्व रा. कराड, जि. सातारा), सदनिका धारक - नंदा अनिल मेहेंदळे, अनिल अरविंद मेहंदळे, अभिजित अरूण कानिटकर (सर्व रा. इचलकरंजी), महेंद्रकुमार सावळाराम डुबल, चंद्रकांत मुरलीधर कदम, चंद्रकांत जगन्नाथ शेलार, तानाजी यशवंत माळी, बाबासाहेब विलास जाधव, अनिल बाळासाहेब पाटील, हणमंत सदाशिव पाटील, पकंज बाजीराव थोरात, अक्षयकुमार बाजीराव थोरात, संतोष रामचंद्र काशीद, तुषार पुंडलिक चोपडे, बाळासाहेब पांढरीनाथ माने, समृद्धी तुकाराम जाधव, कल्याण सिताराम दिवेकर, सत्यनारायण देवकरण सैन (सर्व रा. कराड, सातारा), हिंदा दिलखुश तांबोळी, हिमांगी सुरेश शेनवी, विरेंद्र सुरेश शेनवी, बशीर अमिरलाही फरास, आनंद वसंत ढेकणे (सर्व रा. कोल्हापूर), नईमअहमंद ईब्राहिम मुल्ला (सर्व रा. इचलकरंजी), व्हॅल्युएटर - संजय खोत, योगेश आठले (दोघे कोल्हापूर), देवेंद्र भुसकुटे (सर्व रा. पुणे), एजंट - शिवाजी भागवत वाघमारे, अख्तर रमजान मुल्ला (दोघे रा. प्रतिभानगर). 

मिळकती कराड व परिसरातील... 

फायनान्स कंपनीला तारण दिलेल्या मिळकती या कराड शहर व परिसरातील आहेत. मिळकतीचे क्षेत्र जादा दाखवून, इमारतीचा मजला नसताना तो दाखविणारी खोटी कागदपत्रे त्याचे खोटे व्हॅल्युएशन रिपोर्ट प्लॅटधारक, विकसक, एजंट, व्हॅल्युएटर आणि तत्कालिन व्यवस्थापकांनी तयार करून त्याआधारे गृहकर्ज काढून कंपनीची 11 कोटीची फसवणूक केली. संबधित फ्लॅटधारक कर्जदार कोल्हापूर, इचलकरंजी, कराड भागातील असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे. 

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग... 

फायनान्स कंपनीची 11 कोटीची फसवणुकीचा आकडा मोठा असल्याने व गुन्ह्यातील संशयितांची संख्या मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार त्याची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतली असून तपास सुरू केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT