jayantrao.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यातील पुरबाधीत शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफीसाठी 131 कोटी रुपये

सकाळवृत्तसेवा

सांगली-जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अतिवृष्टीत उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक हेक्‍टर पर्यंतच्या पीक कर्जस माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी आतापर्यंत जिल्ह्याला 131 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

यातील 80 कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी 2020 मध्ये प्राप्त झाला असून आता 15 एप्रिल 2020 रोजी उर्वरित 50 लाख 91 हजाराचा निधी पीक कर्ज माफीसाठी प्राप्त झाला आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सरकारसमोर आर्थिक समस्या असली तरी पूरबाधित कोणीही शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहू नये, यासाठी अर्थमंत्री अजित पवार तसेच अर्थ सचिव यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन सदरची रक्कम विशेष बाब म्हणून जिल्ह्यासाठी उपलब्ध करुन घेण्यात यश आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. 

गतवर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे उदभवलेल्या पूरपरिस्थीतीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या एक हेक्‍टर पर्यंच्या पीक कर्जास माफी देण्यात आली होती. सदर कर्जमाफीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पूरबाधीत शेतकऱ्यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडील 22 हजार 573 शेतकऱ्यांची व राष्ट्रीयकृत व व्यापारी बॅंकांची 5 हजार 873 शेतकऱ्यांची अशी एकूण 28 हजार 446 शेतकऱ्यांचा कर्जमाफी रक्कमेचा मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. 

त्यानुसार 14 फेब्रुवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार 80 कोटी रुपये इतका निधी मिळाला होता. हा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पूरबाधीत शेतकरी कर्जदारांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. 27 मार्च 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये 50 कोटी 91 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. 15 एप्रिल 2020 रोजी 25 कोटी रुपये इतकी रक्कम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे पूरबाधीत कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित 26 कोटी इतकी रक्कम राष्ट्रीयकृत व व्यापारी बॅंकांकडे लेखापरिक्षण होत असलेल्या यादीनुसार वर्ग करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT