mantralay sakal
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

कोरोना काळात एप्रिल २०२१ मध्ये रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागावी या हेतूने राज्यभरात १७० कोटींचे सुमारे १३६ प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आले. मात्र, सध्या तेवढा ऑक्सिजन लागतच नसल्याने देखभाल- दुरुस्तीअभावी दीड-दोन वर्षांपासून प्लांट धुळखात पडून आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना काळात एप्रिल २०२१ मध्ये रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागावी या हेतूने राज्यभरात १७० कोटींचे सुमारे १३६ प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन (पीएसए) ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आले. मात्र, सध्या तेवढा ऑक्सिजन लागतच नसल्याने देखभाल- दुरुस्तीअभावी दीड-दोन वर्षांपासून त्यातील १००हून अधिक प्लांट धुळखात पडून असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राज्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन तयार करणारे १० मोठे कारखाने असून त्यात दररोज १३ हजार ५०० मे.टन ऑक्सिजन तयार होतो. त्यातील केवळ ४०० ते ४५० मे.टन ऑक्सिजन मेडिकल कामांसाठी म्हणजेच हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी वापरला जातो आणि उर्वरित ऑक्सिजन उद्योगांसाठी जातो. पण, कोरोना काळात ऑक्सिजनची गरज दररोज तीन हजार मे.टनापर्यंत पोचली होती. त्यामुळे धुळे, नंदुरबार येथे टॅंकरने शेकडो किलोमीटरहून ऑक्सिजन न्यावा लागला होता. याशिवाय कामगार विमा रुग्णालये, सिव्हिल हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवली.

तसेच उपजिल्हा रुग्णालये, नागरी आरोग्य केंद्रे व काही ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी हवेतून मेडिकल ऑक्सिजन तयार करणारे प्लांट सुरु करण्यात आले. त्याचा मोठा आधार आरोग्य विभागाला मिळाला, पण कोरोनाची लाट कमी झाली आणि त्या कोट्यवधींच्या प्लांटकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले. दररोज काही तास तो प्लांट सुरु ठेवावा लागतो, याशिवाय प्रत्येक तीन ते सहा महिन्यातून एकदा मॉकड्रिल सुद्धा आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञ किंवा तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने सध्या बहुतेक प्लांट बंद पडले आहेत.

वारंवार पत्रव्यवहार करूनही कार्यवाही शून्य

कामगार विमा रुग्णालयाच्या आवारात सोलापूर महापालिकेकडून कोरोना काळात ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आला, पण मागील दोन वर्षांपासून तो बंदच आहे. महापालिकेने त्याचा मॉकड्रिल घ्यावा, अशी दोनवेळा पत्रे पाठवूनही कार्यवाही झालेली नाही.

- डॉ. आसावरी कुलकर्णी, अधीष्ठाता, कामगार विमा रुग्णालय, सोलापूर

आरोग्य विभागाकडून बॉटलिंग प्लांटचा प्रस्ताव

राज्यात कोरोना काळात सुरु केलेले प्लांट कार्यान्वित राहावेत, जेणेकरून ते कायमचे बंद पडणार नाहीत म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागाने त्याठिकाणी बॉटलिंग प्लांट सुरु करण्यास निधी द्यावा, असा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. प्रत्येक प्लांटसाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बॉटलिंग प्लांटसाठी मंजुरी मिळाल्यानंतर त्याठिकाणाहून खासगी रुग्णालयांसह अन्य मोकळे सिलिंडर भरून ऑक्सिजन इतरांना देता येईल. त्यामुळे सर्वच ‘पीएसए’ प्लांट सुरु राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT