पश्चिम महाराष्ट्र

देवा पांडुरंगा, 19 रिपोर्ट निगेटिव्ह आले; आता उरलेले सातपण येऊ दे... 

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः तालुक्यात एक तरूण कोरोनाबाधित सापडल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. त्याच्या संपर्कात आलेल्यांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले आहेत. रिपोर्ट निगेटीव्ह यावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली जात आहे. रिपोर्ट येईपर्यंत त्यांची धाकधाक वाढली आहे. एकेक दिवस त्यांना वर्षासारखा जात आहे.

त्या कोरोनाबधितांच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्‍टरांसह 16 जणांचे तपासणी अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. काल (ता. 8) तिघांचे, तर आज 16 जणांचे अहवाल नगर येथे प्राप्त झाले. त्यांत 19 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' असून, ते सर्व "हाय रिस्क' झोनमध्ये असल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून त्यांना पुढील चौदा दिवस विलगीकरण कक्षात ठेवल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली. 

तालुक्‍यात दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर अन्य आजारांसाठी नाऊर व हरेगाव येथील दोन डॉक्‍टरांनी उपचार केल्यामुळे प्रशासनाने त्यांच्यासह संबंधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या 26 जणांना ताब्यात घेतले. त्यांना तपासणीसाठी नगरला पाठविले. तेथून त्यांच्या घशातील स्राव पुणे येथे तपासणीला पाठविले.

काल (ता. 8) दोन डॉक्‍टरांसह एका सहायकाचा अहवाल "निगेटिव्ह' आला. उर्वरित 16 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. तेही "निगेटिव्ह' असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने या 19 जणांना वडाळा महादेव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. तपासणीसाठी पाठविलेल्या 26पैकी उर्वरित सात जणांचे अहवाल उद्या (शुक्रवारी) प्राप्त होणार असल्याची शक्‍यता वैद्यकीय विभागाने वर्तविली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. योग्य सतर्कता बाळगावी, संचारबंदीचे नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT