Solapur smart city 
पश्चिम महाराष्ट्र

तपासणी न केल्याने "याचे' रखडले हस्तांतरण 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी 88 कोटींची 20 कामे तपासणी न केल्याने धुळखात पडली आहेत. तपासणी न झाल्याने महापालिकेकडे ती हस्तांतरित करण्यात आली नाहीत. त्रयस्थ समिती मात्र गुलदस्त्यात असल्याचे चित्र समोर आले आहे. 

हेही वाचा : महिला गटात पुणे, पुरूष गटात मुंबई उपनगराला विजेतेपद 
हस्तांतराच्या पत्राला केराची टोपली
 
स्मार्ट सिटी अतर्गंत झालेली विकास कामे महापलिकेने हस्तांतरित करून घ्यावीत, असे पत्र महापालिकेला देण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आल्यावर नगरसेवकांनी झालेल्या कामांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घ्यावी आणि मगच हस्तांतरित करून घ्यावे, असा ठराव करण्यात आला. मात्र, ही त्रयस्थ संस्था कोणती आणि त्या समितीत किती अधिकारी आणि सभासद आहेत त्यांनी कामाची तपासणी केली आहे का याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता कोणतीच माहिती मिळाली नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे माहिती मिळेल असे सांगितले. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, आमच्याकडे कामाच्या वेळेस आम्ही प्रत्येक मटेरिअल तपासून घेऊनच काम करतो. मात्र, काम पूर्ण झाल्यावर तापसणी करण्याचा विषय आमच्याकडे नाही, महापालिकेकडे आहे. अशा पद्धतीने स्मार्ट सिटी अन्‌ महापलिका अधिकाऱ्यांमधून टोलवाटोलवीचा सूर निघाला. 

हेही वाचा : ठरला... सोलापूर विद्यापीठाचा नॅक मानंकनाचा मुहूर्त 
नगरसेवकांची मागणी 

स्मार्ट सिटी अंतर्गत जी विकासकामे करण्यात आली आहेत त्या कामांचे हस्तांतरित करण्याचा विषय हा सर्वसाधारण सभेत आला होता. या वेळी त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करूनच हस्तांतरित करून घेण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. मात्र, अद्याप त्याचा अहवाल नगरअभियंता कार्यालयाकडे आला नाही. 
- संदीप कारंजे, नगरअभियंता 

कामापूर्वी तपासणी 
स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामे सुरू आहेत त्या कामापूर्वी आलेल्या मटरेरिअलची तपासणी आम्ही वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील बांधकाम क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून घेत असतो. 
- विजय राठोड, मुख्य तांत्रिक अधिकारी, स्मार्ट सिटी 

हेही वाचा : जिल्हा बॅंकांना सरसकट कर्जमाफीची आशा 
सिमेंटची तपासणी 

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे स्मार्ट सिटी कंपनीने नियुक्त केलेले ठेकदार कामापूर्वी लागणऱ्या मटेरिअलची तपासणी आमच्याकडून घेण्यात आली आहे. रंगभवन ते हरिभाई देवकरण प्रशालेसमोरील रस्त्याच्या बाजूला झालेल्या सिमेंटच्या कठड्यासाठी वापरलेल्या सिमेंटची तपासणी केली आहे. 
- प्रा. प्रदीप तपकीरे 

त्रयस्थ संस्थेची नेमणूक 
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या विकासकामांची तपासणी करून महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा विषय विधानसभा निवडणुकीच्या अगोदर झाला होता. मात्र, आद्याप कोणत्याही त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आली नसल्याने हस्तांतरणाचा विषय रखडला आहे. 
- महेश कोठे, विरोधी पक्षनेते 

अशी केली सूचना

आम्ही फक्त सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामाची तपासणी करून त्याचा अहवाल सभागृहाकडे सादर करावा अशा सूचना केल्या होत्या. स्मार्ट सिटी कंपनीने त्याची तपासणी करून द्यावी. महापालिका आणि सर्वसाधारण सभेत कोणतीही समिती नेमण्यात आली नाही. त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. 
- श्रीनिवास करली, सभागृह नेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT