exam Esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 20810 विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या मते जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रका प्रमाणेच बारावीची वार्षिक परीक्षा पार पडणार आहे.

मिलिंद देसाई

बेळगाव : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 20810 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तसेच पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या निकालात वाढ व्हावी यासाठी अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी विश्वास किरण या योजनेंतर्गत अभ्यासक्रम देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सलग दोन वर्षे बारावीच्या अभ्यासक्रमावर परिणाम झाला होता. तसेच दोन वर्षे परीक्षाही घेण्यात आल्या नव्हत्या. मात्र यावेळी कोरोनाचे संकट असले तरी पदवीपूर्व महाविद्यालये लवकर सुरू झाली आहेत. तसेच दोन वर्षानंतर बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने आतापासूनच परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तसेच एप्रिल महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

पदवीपूर्व शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या मते जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रका प्रमाणेच बारावीची वार्षिक परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारीला लागणे गरजेचे आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 20180 नव विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. तसेच नापास झालेल्या विद्यार्थ्यांनीही परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत.

पुढील महिन्यात बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच परीक्षेच्या तयारीला सुरवात करणे आवश्यक असून दरवर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याची निकालात घसरण होत असल्याने यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी स्वतः प्राचार्याशी संपर्क साधून त्यांना विशेष सूचना करीत आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीमधील विद्यार्थ्यांसाठी हाती घेण्यात आलेल्या विश्वास किरण उपक्रमाचाही विद्यार्थ्यांना चांगला लाभ होत असल्याचे दिसून येत आहे.

बारावीच्या निकालात वाढ व्हावी यासाठी सातत्याने प्राचार्यांशी संपर्क साधला जात असून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच विश्वास किरण योजनेंतर्गत अनुसूचित जाती जमाती मधील विद्यार्थ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. त्यामुळे यावेळी निकालात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

नागराज व्ही, पदवी पूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी,

बेळगाव शैक्षणिक जिल्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचा पुण्यातील बड्या हॉटेल्सना दणका, मथुरा प्युअर व्हेज बंद ठेवण्याचे आदेश; ७ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Pune: पुण्याहून सुटणाऱ्या १२ गाड्यांना प्रीमियम तत्काळ कोटा; रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणार महागात

Marathi Live Updates : नेरुळमध्ये झाड कोसळल्याने रस्त्यावर वाहतूक ठप्प

मराठी अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, शेणाने घर सारवत दाखवली गावाची झलक; Viral Video

Pune: पुणेकरांसाठी मोठा दिलासा! अवघ्या २४ तासांत धरणांत ७०४ एमसीएफटी पाण्याची भर; १८ दिवसांची तहान भागणार

SCROLL FOR NEXT