23 lakh foreign liquor seized on Pune Bangalore highway
23 lakh foreign liquor seized on Pune Bangalore highway 
पश्चिम महाराष्ट्र

पुणे -बेंगळूरू महामार्गावर 23 लाखांची विदेशी दारू जप्त

विजय लोहार

नेर्ले (जि. सांगली) - पुणे- बंगळुरू महामार्गावर कासेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना दारूची मालवाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये रॉक फोर्ड रिझर्व्ह फाईन अँड रेअर व्हिस्की या विदेशी बनावटीच्या 23 लाख रुपयांची दारु व  15 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 38 लाख रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी हस्तगत केला. पोलीसांच्या सतर्कपणामुळे ही कारवाई झाली. 

कासेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केलेली कोरोना व्हायरस संबंधित संचार बंदी काळातील कोल्हापूर परिक्षेत्रातील  ही मोठी कारवाई आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक जिल्हा हद्दीवर  पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सकाळी साडेआठच्या सुमारास सांगली जिल्हा व सातारा जिल्हा हद्दीवर मालखेड फाट्यानजीक कासेगाव पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. आज सकाळी साडे आठच्या दरम्यान  साताऱ्याहून भरधाव वेगाने येणारा ट्रक सांगली जिल्ह्यात जबरदस्तीने प्रवेश करीत मार्गस्थ झाला. यावेळी कासेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ व त्यांच्या पथकाने ट्रकचालकास गाडी थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्याने ट्रक न थांबवता भरधाव वेगाने पुढेच नेऊ लागला. यावेळी महामार्गावरून कासेगावच्या बाजूने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. यावेळी ट्रकची तपासणी केली असता विदेशी बनावटीची ब्रँडेड दारू असल्याचे आढळून आले. यात रॉकफोर्ड रिझर्व्ह व्हिस्की 750 मिलीचे एकूण सहाशे बॉक्स (एकूण रक्कम 23 लाख 17 हजार 938 रुपयांची दारू) जप्त करण्यात आली तर आयशर ट्रक  (रक्कम 15लाख रुपये) असा एकूण 38 लाख 17 हजार 938 रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी जप्त केला. 

ही दारू घेऊन ट्रक गोवा राज्यात निघाला असल्याचे सांगण्यात आले. ट्रक चालक मुनीर ओंकार गिरी (वय, 35. रा. फरीदपूर गोसाई ता. गड जि. हापुर, उत्तर प्रदेश) क्लीनर इरफान अब्दुल कादिर (रा. पटना पुरा न्यू मंडी ग्रह रोड जि. हापुर उत्तर प्रदेश ) यांच्यावर कारवाई करण्यात आली. बंदी काळातील दारू ही जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाही हे माहीत असताना देखील सांगली जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग, संचार बंदी, बंदी काळात  बेकायदेशीर प्रवास सुरु ठेवणे याबद्दल ट्रक चालक व क्लीनर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप पाटील, ज्योती आपुगडे, कासेगाव पोलीस कर्मचारी व विशेष पोलीस अधिकारी यांनी ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT