: stay home tomorrow! १४८ Home Quarantine
: stay home tomorrow! १४८ Home Quarantine 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाचे निम्म्यावर पेशंट घरी, बीडवालाही झाला बरा

सकाळ वृत्तसेवा

नगर - पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून ०४ जणांचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव आल्याने ते आता कोरोनामुक्त झाले आहेत. आलमगीर येथील दोघे रुग्ण तर सर्जेपुरा आणि आष्टी (जि. बीड) येथील प्रत्येकी एक रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. या रुग्णांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या रुग्णासह २४ रुग्णांना आजअखेरपर्यंत कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या १२ जणांवर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एक रुग्ण बाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील इतर दोघांना कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय, सर्जेपुरा  येथील एकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या रुग्णांच्या १४ दिवसांनंतरच्या दोन्ही चाचण्या काल निगेटीव आल्या होत्या. त्यामुळे आज त्यांना बूथ हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.

सध्या बूथ हॉस्पिटलमध्ये जामखेड़ येथील ०५, नेपाळहून संगमनेर येथे आलेले ०४. नेवासा येथील ०२ आणि एक परदेशी असे १२ रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, काल एकाच दिवशी कोरोना बाधितांची संख्या ०५ ने वाढली. नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या १४ व्यक्ती पैकी ०४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे काल स्पष्ट झाले.  

४ एप्रिल रोजी या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, १४ दिवसानंतर १० जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. याशिवाय, जामखेड येथे बुधवारी कोरोना बाधीत आढळलेल्या २ व्यक्तींपैकी  एकाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे काल स्पष्ट झाले.

काही दिवसापूर्वी मृत जामखेड येथील रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या  दोन युवकांना बुधवारी लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT