पश्चिम महाराष्ट्र

पुणे पदवीधरचे 25 हजार अर्ज नामंजूर

प्रमोद बोडके

सोलापूर : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक 2020 मध्ये होत आहे. या निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले आहे. मतदार नाव नोंदणीसाठी सादर केलेल्या अर्जांपैकी पदवीधरचे 25 हजार 266 तर शिक्षकचे चार हजार 127 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

संपूर्ण मतदारसंघातून पदवीधरसाठी दोन लाख 99 हजार 658 जणांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी दोन लाख 71 हजार 898 जणांचा प्रारूप मतदार यादीत समावेश झाला असून 25 हजार 266 जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. शिक्षक मतदारसंघातून 54 हजार एक जणांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 49 हजार 398 जणांची नावे प्रारूप मतदार यादीत आली असून चार हजार 127 जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. नामंजूर केलेल्या अर्जात पदवीचे प्रमाणपत्र/गुणपत्रक न जोडणे, महिला मतदारांच्याबाबतीत माहेरचे नाव, सासरचे नाव याबाबत पुरावा सादर न करणे, शिक्षक मतदारांनी शिक्षक असल्याबाबतचे पुरावे सादर न करणे या कारणास्तव अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. 


कोल्हापूर, सांगली आघाडीवर 
पदवीधर मतदारसंघाच्या नावनोंदणीत सर्वाधिक 69 हजार मतदारांची नोंद सांगली जिल्ह्यात झाली असून त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक लागत आहे. या दोन्ही तालुक्‍यांतील इच्छुकांबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. शिक्षक मतदारसंघाच्या नाव नोंदणीत पुणे जिल्ह्याने बाजी मारली असून या जिल्ह्यात सर्वाधिक 16 हजार मतदार नोंदणी झाली आहे. 

9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती घेता येणार आहेत. ज्या मतदारांचे नाव, पत्ता, लिंग चुकले आहे त्यांना दुरुस्ती करता येईल. ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत त्यांना आवश्‍यक ती कागदपत्रे जोडून नव्याने अर्ज सादर करता येईल. या दोन्ही मतदारसंघाची अंतिम मतदार यादी डिसेंबरला जाहीर केली जाणार आहे. 
- स्नेहल भोसले, निवडणूक उपजिल्हाधिकारी, सोलापूर 

आकडे बोलतात... 
कंसातील आकडेवारी नामंजूर मतदार नोंदणी अर्जाची 
जिल्हा पदवीधर प्रारूप मतदार शिक्षक प्रारूप मतदार 
पुणे 50444 (5547) 16224 (2552) 
सातारा 49088 (8967) 6581 (537) 
सांगली 69094 (3362) 5760 (297) 
सोलापूर 34514 (2431) 10218 (377) 
कोल्हापूर 68758 (4959) 10615 (364) 
एकूण 271898 (25266) 49398 (4127) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT