26 crore for compensationn from Govt.; Grants for farms, houses, dead animals, herds 
पश्चिम महाराष्ट्र

अवकाळी भरपाईपोटी मिळणार 26 कोटी; शेती, घरे, मृत जनावर, गोठ्यांसाठी अनुदान

विष्णू मोहिते

सांगली ः जिल्ह्यात जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेती, पीकांसाठी, अतिवृष्टी व पुरामुळे मृत्यू झालेल्या जनावरांसाठी, नुकसान झालेल्यांसाठी मदतीसाठी राज्य शासनाकडून सुमारे 26 कोटी 10 लाख 68 हजार इतके अनुदान मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिली. 

जिल्ह्यात 10 ते 15 ऑक्‍टोबर काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे 34 हजार 88 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक तासगाव तालुक्‍यातील 8 हजार 414 हेक्‍टरचा समावेश आहे. 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण करुन अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. त्यात 75 हजार 401 शेतकऱ्यांचे सुमारे 37.65 कोटींचे नुकसान झाले आहे. 

द्राक्ष, डाळिंब वंचितच 
द्राक्ष, डाळिंब उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचितच राहणार आहेत. त्यांना मदत मिळण्यासाठी कृषी विभाग, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, द्राक्ष व डाळिंब बागायतदार संघ राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. मात्र अजून तरी त्यात यश आलेले नाही. 

असे मिळणार अनुदान 
मनुष्यहानी, जखमी तसेच नैसर्गिक आपत्तीत घरांचे पुर्णत: नुकसान, घरगुती भांडी, वस्तुंसाठी 66 लाख 43 हजार, मृत जनावरांसाठी 5 लाख 34 हजार, पुर्णत: नष्ट झालेल्या तसेच अंशत: पडझड झालेल्या कच्च्या, पक्‍क्‍या घरे, झोपड्या व जनावरांच्या गोठ्यांसाठी 1 कोटी 45 लाख 52 हजार, शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 33 लाख 32 हजार, शेतीपिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी शासन निर्णयाप्रमाणे भरपाईसाठी 23 कोटी 60 लाख 07 हजार असे एकूण 26 कोटी 10 लाख 68 हजार इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये परतीच्या पावसाचा जोर; कापूस शेतकऱ्यांसाठी वाढली चिंता

तुमच्याकडे गांजा आहे...! पोलिसांच्या वेशात आलेल्या पाच जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT