Sangli Crime News  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Crime : सांगली गुन्ह्यांच्या मालिकेनं हादरलं! सहा महिन्यांत तब्बल 26 खून अन् 68 महिलांवर बलात्कार

Sangli Crime News : अलीकडेच मिरजेजवळ निलजी गावात एका महिलेवर (Woman) बलात्कार करून लुटण्यात आले.

शैलेश पेटकर : सकाळ वृत्तसेवा

चार दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एका गावात मध्यरात्री चौघे एका वस्तीवरील घरात घुसले. कोयत्यासह हत्यारांचा धाक दाखवत सत्तर हजारांचे दागिने लुटले. तेथे महिलेवर बलात्कार झाला.

सांगली : सहा महिन्यांत गुन्ह्यांच्या मालिकेने जिल्हा हादरून गेला आहे. या काळात २६ खून झाले; तर बलात्काराचे (Rape Case) ६८ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. २ दरोडे, ३१ जबरी चोऱ्या आणि दीडशे घरफोड्या झाल्या आहेत. हे आकडे पोलिस यंत्रणेचे अपयश अधोरेखित करीत आहेत.

अलीकडेच मिरजेजवळ निलजी गावात एका महिलेवर (Woman) बलात्कार करून लुटण्यात आले. जतच्या कुंभारीत कुख्यात गुंडाने बंदुकीचा धाक दाखवत दहशत माजवली. गुन्हेगारीतील वर्चस्वाच्या वादातून खून, खुनी हल्ले, जबरी मारहाण या घटना रोजच्या झाल्या आहेत. चोऱ्या, वाटमाऱ्यांनी सामान्य माणसांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

येथे ना मंदिर सुरक्षित आहे, ना बस स्थानक. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेच्या गळ्यात सोन्याचा दागिना असेल, तर तिने जीव मुठीत घेऊन चालावे, इतकी भीतीची छाया सांगली शहरावर पसरली आहे. हे शहर शांत व सुरक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा कमी घटना घडल्या आहेत, असा दावा पोलिस कशाच्या आधारे करतात, याचा शोध घेण्याची व सांगलीकरांची भावना समजून घेण्याची गरज आहे.

पंधरा दिवसांपूर्वी बामणोली (ता. मिरज) येथे मायक्कानगरमध्ये एका सराईताचा धारदार शस्राने वार करून खून करण्‍यात आला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून वाघमोडेनगरला एकावर पिस्तूल रोखत दहशत माजविण्यात आली. तीन पिस्तुलांसह पाच काडतुसे, एडका जप्त करण्यात आला. कुपवाडमध्ये ही घटना घडली. चार दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एका गावात मध्यरात्री चौघे एका वस्तीवरील घरात घुसले. कोयत्यासह हत्यारांचा धाक दाखवत सत्तर हजारांचे दागिने लुटले. तेथे महिलेवर बलात्कार झाला.

माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना होती. त्याची चीड पोलिसांना येत नसेल का? याच चोरट्यांनी पुढे कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी, केरेवाडी गावांत सशस्त्र दरोडा टाकला. दोघांना मारहाण केली आणि ते दंडोबा डोंगरात पळून गेले. नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिस आले. गोळीबार केला. मात्र, चोरटे हाती लागले नाहीत. गुन्हेगारांची इतकी दहशत कशी निर्माण झाली, पोलिसांची यंत्रणा कुठे कमी पडते आहे का, याचे आत्मपरीक्षण करायला नको का?

पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांचा दावा आहे की, जिल्ह्यात गुन्हे कमी झाले आहेत. त्यांनी हे आकडे समोर घेऊन लोकांशी चर्चा करावी. हे गुन्हे कमी कसे? गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात २६ मुडदे पडले, २९ खुनी हल्ले झाले, दोन दरोडे, साडेसहाशे चोऱ्या, तीस जबरी चोऱ्या झाल्या. गुन्हेगारांची वाढती दहशत सांगलीकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे.

आकडेवारी सांगते काय?

(जूनअखेरची स्थिती)

  • खून - २६

  • खुनाचा प्रयत्न - २९

  • दरोडे - २

  • जबरी चोरी - ३१

  • बलात्कार - ६८

  • घरफोडी - १५०

  • गर्दीत मारामारी - ११३

  • फसवणूक - ९७

  • दुखापत - ६५१

‘एलसीबी’ काय करते?

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून कडक कारवाईची अपेक्षा आहे. गेली अनेक वर्षे काही चेहरे खुर्चीला चिकटून आहेत. त्यांचे स्वतःचे नेटवर्क नाही का, या विभागाची नव्याने बांधणी करण्याची गरज आहे का, यावरही अधीक्षकांनी मंथन करावे, अशी खासगीत चर्चा होत असते.

शंभरचा गांजा अन् दहा रुपयांची गोळी

सांगली शहरासह विविध ठिकाणी गांजाची उघड-उघड विक्री केली जाते आहे. आजही पोलिस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर गांजा विक्री केली जाते. नशेच्या गोळ्यांमुळे नवी पिढी बरबाद होते आहे. शंभर रुपयांत गांजा, दहा रुपयांत गोळ्या मिळतात. पोलिसांना ते दिसत नसावे का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Oil Deal: भारतासाठी मोठी खुशखबर! रिफायनरी कंपन्यांना दिलासा, रशियन तेल मिळणार 5 टक्के सवलतीत

Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Shocking : रोहित शर्मा, विराट कोहली यांची ODI मधून निवृत्ती? ICC ने चाहत्यांना दिला धक्का; नेमकं काय घडलं ते वाचा

Mahabaleshwar News: महाबळेश्वरमध्ये थंडी वाढली; २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT