पश्चिम महाराष्ट्र

यात्रा कंपनीच्या नावे 45 लाखांची लुट 

शैलेश पेटकर

सांगली -  भिवंडी (ठाणे) येथीर रमजान टुरिस्ट कंपनीने उमराह यात्रेसाठी 45 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत यात्रा कंपनीचे रमजान खान, शमशेर खान, मुस्ताक शमशेर (तिघे रा. भिवंडी, ठाणे) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगलीसह कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातील 180 यात्रेकरूंची ही फसवणूक करण्यात आली आहे. दिलावर सिकंदर शेख (43, बुधगाव) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दिलावर शेख हे भिवंडीतील रमजान टुरिस्ट कंपनीचे सांगली प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. तसेच शाहबा बडेखान नदाफ हे कोल्हापूर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. उमराह यात्रेसाठी जाण्यासाठी व्हिसासह विमान तिकिटांसाठी त्यांनी यात्रेकरूंची भेट घेण्यास सुरूवात केली. फेब्रुवारी 2018 पासून त्यांनी सांगली, कोल्हापूर आणि पुण्यातील 180 यात्रेकरूंकडून पैसे घेतले. त्यात 26 हजार, 38 हजार आणि 47 हजारांची रक्कम होती. ती रक्कम त्यांनी यात्रा कंपनीचे रमजान खान, शमशेर खान, मुस्ताक शमशेर यांच्या खात्यावर भरले.

जानेवारी 2019 मध्ये यात्रा जाणार होती. महिना बाकी राहिला तरी, कोणताही निरोप यात्रा कंपनीकडून मिळत नसल्याने यात्रेकरूंनी दिलावर यांना विचारणा सुरू केली. त्यांनी भिवंडीतील तिघांनाही दुरध्वनीवरून संपर्क साधाला, तिघा संशयितांनीही वारंवार टाळाटाळ केली.

यात्रेकरूंनीही पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्याकडे तक्रारी केली. तक्रारीची चौकशी केली असता, ती फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार तिघा संशयितांनी यात्रा कंपनीच्या नावे 45 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

बॅंक खाते गोठवण्याचे पत्र 
रमजान टुरिस्ट कंपनीचे रमजान खान, शमशेर खान, मुस्ताक शमशेर यांचे आझाद चौकातील ऍक्‍सिस बॅंकेत खाते आहे. त्या खात्यावरूनच पैसे पाठविण्यात आले होते. ते खाते गोठविण्याचे पत्र पोलिसांनी बॅंक प्रशासनाच दिले आहे. त्याची कारवाईही सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT