52 Familyer Help Narwad Animations School Sangli Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

५२ कुटुंबांच्या मदतीने नरवाड शाळा ॲनिमेशन दुनियेत

सकाळ वृत्तसेवा

मिरज (सांगली) : जिल्हा परिषदेच्या द्विशिक्षकी शाळांचे रूपडे लोकवर्गणीतून बदलू लागले आहे. नवनविन तंत्रज्ञान आधुनिक बदल डिजिटल शिक्षण पद्धती या सर्वच गोष्टी स्मार्ट फोनमुळे सोप्या बनल्या आहेत. याचीच चुणूक जिल्हा परिषद शाळांमध्ये दिसू लागली आहे. आपण हायटेक झालो तरच आपले अस्तित्व दिसणार असल्यामुळे काहीतरी केले पाहिजे. या उद्देशाने शाळा झटत आहेत. यामध्ये मिरज तालुका अग्रेसर राहिला आहे.


मिरज तालुक्‍यातील नरवाड येथील माळीवाडी वस्ती शाळा आपल्या हायटेक लूकमुळे नव्याने ओळखली जाऊ लागली आहे. यासाठी मुख्याध्यापिका वैशाली जगताप आणि सहकारी शिक्षिका सविता वांजुळे यांनी माळीवाडी वस्ती शाळेमध्ये नवचैतन्य फुलवले आहे. शाळेचा बाह्यरूप ॲनिमेशनच्या कार्टून्समुळे  प्राप्त झाला आहे. तसेच वाचन कट्टा, स्वच्छ सुंदर बगीचा, हॉडवॉश स्टेशन, ई-लर्निंग अध्यापन आदि सुविधा उपलब्ध आहेत. या नावीण्यपूर्ण शाळेची पट संख्या २३ वरून ३३ वर पोहोचली आहे.

ग्रामस्थांची माेलाची मदत

शाळेच्या एकसष्ठीनिमित्त माळीवाडी वस्तीवरील ५२ कुटुंबांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे मुख्याध्यापिका वैशाली जगताप यांनी सांगितले. शाळेमध्ये विविध शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, बाल कविता, वैज्ञानिक प्रकल्प, गणिती क्रिया, इंग्रजी व्याकरण आदी शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. माजी सैनिक आण्णासाहेब कवितकर यांनी शाळेसाठी दिलेली ही सात गुंठेचा परिसर हायटेक बनला आहे. यासाठी सरपंच राणी नागरगोजे व शाला समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने शाळेमध्ये अनेक सुविधा दिल्या जातील अशी माहिती सरपंच यांनी दिली आहे. 

या सुविधांमुळे अध्यापनास प्रोत्साहन

शाळेच्या क्रीडांगणातून शालेय भिंतींवरील पाढे, वाचन कट्टा, बोलक्‍या भिंती, कार्टून्स, डिजिटल भिंती, वरांड्यातील भिंतीवरील बाराखडी यामुळे मुक्त क्रीडांगणात खेळत अध्यापनाचा आनंद घेता येतो.

कशी झाली हायटेक शाळा
यासाठी नव्या मुख्याध्यापिका वैशाली जगताप व सहकारी यांनी शाळेच्या एकसष्ठी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम ठेऊन वस्ती वरील ५२ कुटुंब आणि माजी विद्यार्थ्यांकडून लोकवर्गणीतून निधीची जुळवा जूळव केली. तब्बल दोन लाख रुपयांचा निधी जमविला आणि मग सहा महिन्यांच्या कालावधीत शाळेचे पूर्णत: रूपडे बदलले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT