पश्चिम महाराष्ट्र

कोयनेतून 53,882 तर राधानगरीतून 4256 क्युसेक विसर्ग

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 2856 क्युसेकने विसर्ग व विद्युत विमोचकामधून 1400 असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सायंकाळी चार वाजता सुरू आहे. कोयना धरणामधून 53,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली. 

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सायंकाळी चार वाजता 49 फूट 11 इंच असून, एकूण 101 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.24 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. 

पंचगंगा नदीवरील - राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली, सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ व  वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे, चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 101 बंधारे पाण्याखाली आहेत. 

जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा

तुळशी 3.27  टीएमसी, वारणा 32.46 टीएमसी, दूधगंगा 23.72 टीएमसी, कासारी 2.57 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.52 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.37, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी

राजाराम 49.11 फूट, सुर्वे 48.6 फूट, रुई 79.3 फूट, इचलकरंजी 77 फूट, तेरवाड 81.4 फूट, शिरोळ 76.9 फूट, नृसिंहवाडी 76.9 फूट, राजापूर 62.9  फूट तर नजीकच्या सांगली 54.5 फूट आणि अंकली 59.3 फूट अशी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT