पश्चिम महाराष्ट्र

खुशखबर.. या शहरात थकबाकीदारांना दंडात 75 टक्के सवलत 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः स्मार्ट सिटी योजनेत पहिल्या यादीत समावेश झालेल्या सोलापूर शहरातील तब्बल 50 हजार थकबाकीदारांना त्यांना झालेल्या दंडामध्ये 75 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त दीपक तावरे यांनी गुरुवारी जारी केले. मिळकत कराची थकबाकी असेल तर दरमहा दोन टक्के दंड लावण्याची तरतूद राज्य शासनाने केली आहे.

दंडाची रक्कम 58 कोटी रुपये
सोलापूर शहरातील गावठाण भागात 93 हजार 822 मिळकतदार आहेत. त्यापैकी 43 हजार 228 मिळकतदारांनी नियमित बिल भरले आहे. तर 50 हजार 594 मिळकतदारांना दोन टक्के दंड झाला आहे. ही थकबाकी 58 कोटी 94 लाख 72 हजार 183 इतकी आहे. या रकमपैकी 75 टक्के दंडाची रक्कम ही माफ केली जाणार आहे. मात्र त्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत संबंधित मिळकतदाराने त्याच्याकडील सर्व थकबाकी एकवट भरणे आवश्यक आहे. 

नोटीस व वॅारंट फी पूर्णपणे माफ
दंडाच्या रकमेत 75 टक्के माफ करण्याबरोबरच नोटीस व वॅारंट फीही पूर्णपणे माफ केली जाणार आहे. शहर व हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडे 3.81 कोटींची वॅारंट फी आणि 1.72 कोटींची नोटीस फी थकीत आहे. ही सर्व माफ होणार आहे. 

हद्दवाढीतील मिळकतदारांना 42 कोटींचा दंड
हद्दवाढ भागातील मिळकतदारांना आतापर्यंत 42 कोटींचा दंड झाला आहे. त्यापैकी 75 टक्के रक्कम आता माफ होणार आहे. शहर व हद्दवाढ मिळून एकूण दंडाची रक्कम
सुमारे 100 कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी जवळपास 75 कोटींचा दंड माफ होण्याची शक्यता आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

lok sabha result: "उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग..."; लोकसभेच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय घोषित

Team India Head Coach : लक्ष्मण होणार द्रविड यांचे उत्तराधिकारी? गंभीर, लँगर यांचीही नावे चर्चेत

Google I/O 2024 : जेमिनी 1.5, सर्च एआय अन् बरंच काही.. गुगलच्या इव्हेंटमध्ये काय-काय झालं लाँच? जाणून घ्या

SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी अन् प्रफुल्ल पटेलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला - संजय राऊत

SCROLL FOR NEXT