पश्चिम महाराष्ट्र

दोन लहान मुलांसह विवाहितेची आत्महत्या; लेंगरे येथील घटना

सकाऴ वृत्तसेवा

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उजिता यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीत तरंगताना दिसून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

विटा (सांगली) : लेंगरे (ता. खानापूर) येथे विवाहित महिलेने सहा वर्षांची चिमुरडी आणि एक वर्षाच्या लहान मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. उजिता जोतिराम शिंदे (वय ३०), रिया जोतिराम शिंदे व केदारनाथ जोतिराम शिंदे अशी मृतांची नावे आहेत. याबाबत पोलिस पाटील पुष्पा बोबडे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. (A woman with two small children has committed suicide in langare)

याबाबत पोलिसांनी सांगितले, की लेंगरे येथील जोतिराम शिंदे हे अमरावती येथे पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांची पत्नी उजिता काही दिवसांपूर्वी माहेर कलेढोण येथून लेंगरे येथे आल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या मुलांसह घरातून बाहेर गेल्या होत्या. बराच वेळ झाल्यानंतर उजिता परत न आल्याने पती जोतिराम यांच्यासह घरातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उजिता यांचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असणाऱ्या विहिरीत तरंगताना दिसून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिस निरीक्षक संतोष डोके, हवालदार अमोल पाटील, अक्षय माने यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने उजिता यांचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मात्र, रात्रीच्या अंधारात मुलांचा तपास लागला नाही. शनिवारी सकाळी रिया आणि केदारनाथ यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पती जोतिराम यांनी उजिता यांना अमरावती येथे नेण्यासाठी ई-पास काढला होता. मात्र तोपर्यंतच ही दुर्दैवी घटना घडली. शनिवारी दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

(A woman with two small children has committed suicide in langare)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

IPL 2026 : इशान किशन कर्णधार, अभिषेक शर्माकडे उप कर्णधारपद... संघात खांदेपालट... आणखी एक अचंबित करणारा निर्णय

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत टँकरमाफियांचा हैदोस, अडीच हजाराच्या टँकरची १० हजारांना विक्री; पालिकेत विरोधक आक्रमक

SCROLL FOR NEXT