above 375 homes collapsed people opened up due to heavy rains; Picture of Atpadi taluka
above 375 homes collapsed people opened up due to heavy rains; Picture of Atpadi taluka 
पश्चिम महाराष्ट्र

अतिवृष्टीने पावणेतीनशे लोकांचा संसार उघड्यावर; आटपाडी तालुक्‍यातील चित्र

नागेश गायकवाड

आटपाडी (जि. सांगली) : थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात गारवा देणाऱ्या माळवदी घराला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा फटका बसला आहे. प्रशासनाने पडझड झालेल्या पंचनामे केलेल्या घरांची संख्या तब्बल दोनशे सत्याहत्तर झाली आहे. अतिवृष्टीने तिघांच्या बळीची नोंद केली आहे. घरांची कमी-जास्त आणि अनेक ठिकाणी पूर्ण पडझड झाल्यामुळे 'ती' कुटुंबे बेघर झाली आहेत. यातील अनेकांचा संसार उघड्यावर पडला असून त्यांना तत्काळ मदतीची आवश्‍यकता आहे. 

आटपाडी तालुका कमी पावसाचा आणि जास्त उष्णतेचा भाग येतो. नैसर्गिक वातावरणानुसार लोकांची घरे आहेत. पावसापासून जास्त धोका नसल्यामुळे थंडी आणि कडक उन्हापासून संरक्षण होण्याच्या दृष्टीने लाकडी माळवदी घराची संख्या मोठी आहे. दगडाच्या भिंती,वर लाकडाचे बडोद,फरशी आणि त्यावर करल अशी रचना असते. त्यामुळे थंडीत उबदार वाटते आणि उन्हाळ्यात लवकर तापत नसल्यामुळे आत थंडावा राहतो. पण आज हीच घरे धोक्‍यात आली आहेत.

तालुक्‍यात एकाच वेळी 45 मिलिमीटर पेक्षा जास्त तब्बल पाच वेळा पाऊस पडला. दोन वेळा तर शंभर मिलिमीटरची नोंद आहे. याशिवाय पाच महिने पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. बहुतांश माळवदी घरे गळली आहेत. घरावरील भिंती आणि वरचे छत भिजल्यामुळे भिंती कुमकुवत होऊन घरे कोसळली आहेत. तलाठी आणि ग्रामसेवक यांनी आत्तापर्यंत 277 घरांचे पंचनामे केलेत. काही घरांच्या एक भिंत, दोन भित,काहींचे पूर्ण छप्पर कोसळले आहे.

काही ठिकाणी घराचा सांगाडा दिसत असला तरी ती घरे राहण्यायोग्य राहिलेली नाहीत. पण पंचनामे करताना 20 ते 30 40 टक्के नुकसान दाखवले जाते. वास्तविक घराचा सांगाडा दिसत असला तरी ती कुटुंब अक्षरशा बेघर झालीत. इतर अनेक घरांना मोठी गळती लागली असून भिंती ओल्याचिंब झालेल्या आहेत. ती घरे धोकादायक बनलीत. अनेकांनी घरे महागडया प्लास्टिकचया कागदानी झाकली आहेत. 

मृत्यू सात, नोंद तीन निकष आडवे 
आटपाडीत घराची भिंत पडून दोन सख्या जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाला तर करगणी येथील तरुण पाय घसरून बंधाऱ्यात पडल्याने मृत्यू झाला होता. या तीन मृत्यूची महसूल विभागाने नोंद केलेली आहे. मात्र आटपाडीत ंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्या आई -मुलीचा आणि बालेवाडी येथील जुळ्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला होता. त्याची नोंद घेतलेली नाही. येथेही त्यांच्या मृत्यूची नोंद घेण्यासाठी निकष आडवे आलेत. 

संपादन : युवराज यादव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT