accident in sangli nerle of one family two person dead in accident 
पश्चिम महाराष्ट्र

कुटुंबाला वाटेतच गाठले काळाने ; मुलगी पहायला निघालेल्या गाडीला भीषण अपघात, दोघे ठार

विजय लोहार

नेर्ले (सांगली) : येथील आशियायी महामार्गावर दत्त भुवन जवळ झालेल्या अपघातात चारचाकी गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एक पुरुष व एक महिला ठार झाली. लग्नासाठी मुलगी पहाण्याला पुण्याला निघालेल्या कुंभार कुटूंबासोबत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात सुमो कारचा चक्काचूर झाला असून जखमींना स्थानिक लोकांनी इस्लामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

याबाबतीत कासेगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंकली (ता. मिरज) येथील एकाच कुटूंबातील ११ लोक मुलगी पाहण्यासाठी पुणे येथे (सुमो क्र.  एम. एच. १० बी. ए. ६३९७) मधून आशियाई महामार्गावरून जात असताना हॉटेल दत्त भुवन येथे आले असता, गाडीचा टायर फुटला आणि गाडी महामार्गाच्या शेजारील ओढ्याच्या दिशेने पाचशे फुटावर जाऊन पलटी झाली. हा भीषण अपघात घडताच स्थानिक लोकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात पाठवून दिले.

या अपघातामध्ये गाडीचा चालक श्रीकांत आण्णापा कुंभार (वय ५०)  (रा. अंकली ता. मिरज) व स्वप्नाली प्रमोद कुंभार (वय ३५) रा. इचलकरंजी ता. हातकणंगले हे दोघे ठार झाले तर या अपघातात पंकज सुनिल कुंभार (२९), सुरेखा सुनिल कुंभार (४२), सुनिल मल्लापा कुंभार (५२), प्रकाश मल्लापा कुंभार (४०), अरुण मल्लापा कुंभार (४०), गीतांजली अरुण कुंभार ( ३८), निलम श्रीकांत कुंभार (३६) सर्व रा. कुंभार गल्ली अंकली ता. मिरज मयूर प्रमोद कुंभार (१२) रा. इचलकरंजी ता. हातकणंगले व सदाशिव मारुती कुंभार(५६) रा. बेडग्याहळ ता. चिक्कोडी हे जखमी झाले आहेत.

सदर अपघाताचा तपास हेड कॉन्स्टेबल गायकवाड करीत आहेत. कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. याबाबत मोटर अपघात  पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT