पश्चिम महाराष्ट्र

वाई : शिरगाव घाटातील अपघातात एक ठार ; उस्मानाबादचे युवक जखमी

सकाळ वृत्तसेवा

भुईंज (जि. सातारा) : वाई शिरगाव घाटामध्ये  ट्रक आणि एका चार चाकीच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान ठार झालेल्या व्यक्तीचे नाव अद्याप पाेलिसांना समजलेले नाही.    

हा अपघात गुरुवारी रात्रीच्या सुमारास झाला.  एमएच ११ एम ३५११ या ट्रक समोरून येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एमएच १२ जेवाय ४६८४ यास हुलकावणी देताना पलटी झाला. हा ट्रक बाेअरवेलच्या कामासाठी वापरला जाताे. हा ट्रक पलटी झाल्याने ट्रकवर बसलेले मजूर रस्त्यावर पडले तसेच त्यांच्या अंगावर ट्रकमधील लोखंडी अवजड पाइपही पडल्या.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार वाठार पिंपोडेकडून वाईच्या दिशेने येणारे चार चाकी वाहन एका अवजड वळणावर येताना समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळले. ही धडक इतकी भाषण हाेती की तार ताकी वाहन घाटातून खाली चाळीस फूट काेसळले. 

जरुर वाचा - पुण्यातील युवकाने मित्रांना 20 लाखांना फसविले

दरम्यान अपघात झाल्याचे समजताच शिरगाव ग्रामस्थांनी तातडीने घाटात जाऊन मदतकार्य केले. यामध्ये त्यांनी जखमींना बाहेर काढले. हे मदत कार्य सरपंच दीपक तोडरमल,  सागर भोसले,  विकास भोसले,  अजित मोरे यांनी युवकांचे सहकार्याने केले. घटनास्थळी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, भुईंज पोलीस उपनिरीक्षक श्याम बुवा, हवालदार धनाजी कदम शिवाजी तोडरमल, चंद्रकांत जाधव, विजय अवघडे आदींनी वहातुक सुरुळीत केली.

या अपघातामध्ये अतुल ढेकणे, गणेश देटे, दीपक गव्हाणे, व्यकंट देशमुख, परमेश्वर चव्हाण (सर्व राहणार उस्मानाबाद) हे सर्वणज जखमी झाले आहेत. त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT