accident.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रक-चारचाकीच्या भिषण अपघातात दोघांचा मृत्यू

राजकुमार थोरात

वालचंदनगर : बोरी (ता. इंदापूर) येथील दोघांचा पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज येथे अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एका युवकाचा व ज्येष्ठ महिलेचा समावेश असून, अपघातामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघामध्ये संतोष अर्जुन नाचण (वय ४२) या युवकाचा व रामकुवर धन:शाम डफळ (वय ७०, रा. दोघे बोरी ता. इंदापूर) या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर अपघामध्ये आशाबाई नाचण (रा.बोरी) व लक्ष्मी जाडकर (रा.नातेपुते, ता. माळशिरस) दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, उपचारासाठी पुण्यामधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

शुुक्रवारी (ता.२०) रोजी रात्रीच्या ९ वाजण्याच्या सुमारास संतोष नाचण हे भिगवण मार्गे चारचाकी गाडीमधून बोरीकडे येत असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील  डाळज फाटा येेथे इंदापूरकडून पुण्याकडे  वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला.

अपघामध्ये नाचण व डफळ या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नाचण हे गाडी चालवत होते. अपघामध्ये चारचाकी गाडीचा चक्काचुर झाला असून, एकाच गावातील दोघांच्या मृत्यूमुळे बोरी गावावरती शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT