weekend curfew sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : विकेंड कर्फ्यु काळात विनाकारण रस्त्यावर फिरणांऱ्यावर कारवाई

बेळगावात अलीकडे मोठ्या प्रमाणात तोतया पत्रकारांची संख्या वाढली आहे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विकेंड कर्फ्यु (weekend curfew) काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यावर कारवाई करून पोलिसांकडून संबंधितांची वाहने जप्त केली जात आहेत. सदर वाहने विकेंड कर्फ्यु संपल्यानंतर म्हणजे सोमवारी सोडून देणे गरजेचे आहे. मात्र, साहेबांच्या मर्जीतील पोलीस वाहनचालकांकडून जादा पैसे घेऊन अवघ्या काही वेळातच पोलीस ठाण्यातून परस्पर वाहने सोडून देत आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

कर्फ्यु काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणाला रस्त्यावर फिरत येत नाही. पण, बेळगाव शहर, उपनगर ग्रामीण भागात विकेंड कर्फ्यु आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. कारण ग्रामीण भागातील सर्व व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू आहेत. तसेच शहर आणि उपनगरात देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांची संख्या वाढली आहे. ठोस कारण नसताना देखील थातूरमातूर करणे सांगून फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाहतूक पोलिसांनी ठीकठिकाणी काल रात्रीपासूनच रस्त्यावर बॅरिकेट्स वाहन चालकांची विचारपूस करीत आहेत. ठोस कारने नसांगणाऱ्यांची वाहने जप्त करून पोलिस ठाण्याकडे नेली जात आहेत. जप्त केलेल्या वाहनमालकांनी पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात दंड भरल्यानंतर सदर वाहने सोमवारी सोडून देणे आवश्यक आहे. मात्र, वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करून वाहतूक पोलिस ठाण्यातील साहेबांच्या मर्जीतील पोलीस परस्पर जादा रक्कम घेऊन वाहने सोडून देत आहेत. पोलिसांनी दिलेली दंडाची पावती खिशात ठेवून संबंधित वाहनचालक पुन्हा दिवसभर त्या पावतीच्या नावावर शहरात फिरत आहेत. त्यामुळे या प्रकाराकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वाहनचालकांची होणारी लूटमार थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.(Curfew update)

बेळगावात अलीकडे मोठ्या प्रमाणात तोतया पत्रकारांची संख्या वाढली आहे. बनावट ओळखपत्र तयार करून तसेच वाहनावर प्रेस असे लिहून बहुताजण विनाकारण फिरत आहेत. त्यामुळे अशा बनावट पत्रकारांचा त्रास पोलीस खात्याला देखील होत आहे. त्यामुळे पोलिसांनी तोतया पत्रकारांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

विकेंड कर्फ्युकाळात विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांची वाहने जप्त केली जात आहेत. विकेंड काळात जप्त केलेली वाहने कर्फ्यु संपल्यानंतर सोमवारी सोडून देण्याची सूचना करण्यात आली आहे. आपत्कालीन काळात संबंधितांची वाहने सोडून दिली जात आहेत. मात्र, जादा पैसे आकारून वाहने सोडून दिली जात असल्यास याची चौकशी केली जाईल.

- शरणाप्पा, साहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT