Administration's three level program in Valva taluka to fight floods 
पश्चिम महाराष्ट्र

अशी आहे तयारी महापुराशी लढण्याची... वाचा

पोपट पाटील

इस्लामपूर : अचानक उद्‌भवणाऱ्या पूर स्थितीचा सामना करण्यासाठी वाळवा तालुक्‍यातील महसूल प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय कार्यक्रम आखण्यात आला आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनांची अंमलबाजवणी करण्याचे काम जोरदारपणे सुरु आहे. महापुर उद्‌भवल्यास उपाययोजना राबवताना कोनोनासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालनही करण्यात येणार आहे. 

वाळवा तालुक्‍यात पुरपट्यात 34 गावांचा समावेश आहे. इस्लामपूर विभागामध्ये बोरगाव, ताकारी, रेठरेहरणाक्ष, बिचुद, दुधारी, फार्णेवाडी, गौंडवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, कासेगाव, धोत्रेवाडी, बहे, तांबवे, कोळे, नरसिंहपूर, शिरटे, हुबालवाडी, खरातवाडी, चिकूर्डे, ठाणापुढे, देवर्डे, ऐतवडे खुर्द, वाळवा, जुनेखेड, नवेखेड, शिरगाव, मसुचिवाडी अशा 27 गावांचा तर आष्टा विभागात भरतवाडी, कणेगाव, शिगाव, मर्दवाडी, कृष्णानगर, मिरजवाडी, कारंदवाडी विभागात अशा 7 गावांचा समावेश आहे. या प्रत्येक गावांत नैसर्गिक रचनेनुसार पुरस्थितीचे तीन टप्पे केले आहेत.

पहिल्या टप्प्यात गावातील नदीकाठाच्या भाग, दुसरा टप्पा त्याच्यापेक्षा थोडा सुरक्षित भाग व तिसऱ्या टप्प्यात सुरक्षित भाग असे टप्पे केलेले आहेत. तहसील कार्यालयातून यावर नियंत्रण होणार आहे. गावपातळीवर याच्या दोन समित्या नेमल्या आहेत. गावातील सामाजिक कार्यकर्त्यांची एक व शासकीय स्तरावर सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, सर्कल यांची एक समिती असेल. 1 ते 10 जूनपर्यंत त्यांना महापूर संबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशासनाने प्रत्यक्षात महापूर आल्यानंतर नागरिक व जनावरांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी मंदिरे, कार्यालय, शाळेच्या इमारती या जागा आरक्षित करण्याचे काम सुरू आहे. या सर्व गावांना पावसाच्या पाण्याच्या पुराचा धोका निर्माण होणार असे गृहीत धरून त्याप्रमाणे प्रशासनाने कामकाजाचे नियोजन सुरु केले आहे. पूर पट्यात तीन टप्यात विभागणी केली आहे. या गावातील ज्या ठिकाणी सुरवातीस महापुराचा जास्त धोका आहे अशा ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन त्यावेळच्या स्थितीवरुन तात्काळ उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे दुसरा व तिसरा टप्पा करण्यात आला आहे. नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून त्यात्या ठिकाणचे निर्णय घेण्यात येणार आहेत. 

महसूल प्रशासनाकडून जुन्या बोटींची दुरुस्ती व नवीन बोटी खरेदी प्रक्रीया सुरु आहे. तालुक्‍यातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. त्यानुसार पूर पट्यात येणाऱ्या गावांना बचावासाठीच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. इंजिन बोटी, प्रत्येकाला पाण्यात बचावासाठी किट, अत्यावश्‍यक म्हणून बॅटरीची खरेदी या बाबींची खरेदीकरण्यास सूचना देण्यात आली आहे. 

अतिवृष्टी व महापूर यांसाठी प्रत्येक गावाशी संपर्क साधून त्याबाबत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये संबंधीत नागरिकांना सुरवातीपासूनच सतर्क राहण्यास सांगितले आहे. पुर भागात येणाऱ्या बॅंका व शासकीय कार्यालयातील महत्वाच्या कागदपत्रांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले आहे. 

पंचायत समितीच्या माध्यमातून नागरिकांना सातर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंचायत समितीला शासनाकडून अनुदान कमी मिळत असल्याने पंचायत समिती सभापतींनी स्वतःच्या फंडातून पुरपट्यासाठी यांत्रिकी बोट घेऊन देण्याचे नियोजन केले आहे. 

या वर्षी महापुराच्या नियंत्रणासाठी तीन टप्प्यांची रचना 

  • पहिल्या टप्प्यात बाधीत गावातील नदीकाठचा भाग 
  • दुसऱ्या टप्प्यात गावातील कमी सुरक्षित भाग 
  • तिसऱ्या टप्प्यात गावातील सुरक्षित भाग 

या तीन टप्प्यानुसार बाधीत क्षेत्रातील लोकांना हलवणे, त्यांची इतरत्र व्यवस्था करणे अशी कामे कोरोनासंदर्भातील नियम पाळून होणार आहेत. 

21 कोटींच्या निधीचे वाटप 
पंचायत समितीमार्फत गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व महापूर यामुळे झालेल्या बाधित घराचे पंचनामे करुन त्याठिकाणच्या अवस्थेवरुन निधीचे वाटप करण्यात आले होते. पूर्ण पडझड झालेल्या घरांसाठी 95 हजार 100 रुपया प्रमाणे 835 घरांना 7 कोटी 94 लाख 8 हजार 500, धोकादायक पडझड झालेल्या 1220 घरांना 11 कोटी 60 लाख 22 हजार, अंशतः पडझड झालेल्या 2380 घरांना प्रत्येकी सहा हजार प्रमाणे 1 कोटी 42, लाख,80 हजार असे एकूण 20 कोटी 97 लाख 10 हजार 500 इतका निधी वाटप करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT