Administrator Rule In Sangli ZP From 20 December
Administrator Rule In Sangli ZP From 20 December 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली मिनी मंत्रालयात "प्रशासक राजवट'? 

सकाळ वृत्तसेवा

सांगली - जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत येत्या शुक्रवारी (ता. 20) पासून प्रशासक राजवट लागू होण्याचे संकेत मिळत आहेत. नव्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम ऐनवेळी लांबणीवर पडल्याने सर्व सूत्रे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या हाती येण्याची शक्‍यता आहे. राज्य शासनाकडून अद्याप त्याबाबत स्पष्ट सूचना आलेल्या नसल्याने तरी नागपूर येथील अधिवेशनात ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी तसेच संकेत दिले आहेत. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 120 दिवसांसाठी लांबणीवर टाकण्यात आला होता. ती मुदत 20 डिसेंबरला संपत आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने 21 डिसेंबरला नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र तो तांत्रिक मुद्द्यात अडकल्याने लगेचच रद्द करण्यात आला. ती अनिश्‍चित काळासाठी रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. त्यामुळे मुदतवाढ मिळणार का, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष होते. 
श्री. भुजबळ यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनंतर मात्र बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ दिलेली नसल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे 20 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेवर प्रशासक येणार हे निश्‍चित मानले जात आहे. 

सीईओ राऊत यांचीच नेमणूक निश्‍चित

या काळात सर्व अधिकारी प्रशासकांकडे असतील. प्रशासक म्हणून सीईओ राऊत यांचीच नेमणूक निश्‍चित असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्वच अधिकारी येतील. त्यानंतर किती काळात सभापती निवड आणि त्यानंतर अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. 

शिवसेनेशिवाय सत्तेसाठी भाजपकडून जुळवाजुळव 

सांगली  जिल्हा परिषदेत शिवसेनेशिवाय सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. सत्तेचा जादूई आकडा गाठणे भाजपसाठी फार दिव्य ठरू नये, यासाठी नवनवे पर्याय विचारात घेण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने महाडिक गटासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसचे काही सदस्य भाजपचे अनधिकृत "सहयोगी' असल्याने त्यांचे वजन भाजपच्या पारड्यात पडणार, असे सांगितले जात आहे. 

अध्यक्षपद अश्‍विनी नाईक यांना मिळणार ?

जिल्हा परिषदेत सत्तांतर व्हावे, यासाठी राष्ट्रवादी, कॉंग्रेसने पुढाकार घेऊन हालचाली सुरू केल्या आहेत. नवे सत्तासमीकरण जुळले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेवर येऊ शकते आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद अश्‍विनी नाईक यांना मिळू शकते. त्यामुळे या नव्या जुळवाजुळवीसाठी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पुढाकार घ्यावा, असे प्राथमिक ठरलेले आहे. त्यादृष्टीने नागपूर अधिवेशनातच चर्चा होतील, असे संकेत मिळत आहेत. या घडामोडी गतिमान होत असताना भाजपने मात्र हातून सत्ता सटकू नये, यासाठी पक्की जुळवाजुळव केली आहे. पक्षांतर्गत गटबाजी विसरून साऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न जतपासून सुरू झाला आहे. भाजपकडे 24 सदस्य आहेत. दोन सदस्य भाजप पुरस्कृत आहेत. ही आकडेवारी 26 होते. फक्त चार सदस्यांची आवश्‍यकता असेल. त्यात कॉंग्रेसचे दोन सदस्य थेट मदत करतील, अशी चर्चा आहे. महाडिक गटाला सभापतिपद दिल्यास रयत विकास आघाडी भाजपसोबत जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या स्थितीत शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे, मात्र ते मनापासून भाजपला साथ करतील, असेच संकेत मिळत आहेत. त्यामुळे या घडीला भाजप गणित जुळवण्यासाठी अधिक आक्रमक दिसतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT